आनंदला दुहेरी पराभवाचा धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2015 23:50 IST2015-10-12T23:50:39+5:302015-10-12T23:50:39+5:30

विश्व जलदगती बुद्धिबळ स्पर्धेत माजी जगज्जेता विश्वनाथ आनंदला दुहेरी पराभवाला सामोरे जावे लागले. अजरबैजानचा राऊफ मामेदोव व रशियाचा डेनिस किसमातुलिन यांनी त्याच्यावर विजय मिळविला

Anand returns to double defeat | आनंदला दुहेरी पराभवाचा धक्का

आनंदला दुहेरी पराभवाचा धक्का

बर्लिन : विश्व जलदगती बुद्धिबळ स्पर्धेत माजी जगज्जेता विश्वनाथ आनंदला दुहेरी पराभवाला सामोरे जावे लागले. अजरबैजानचा राऊफ मामेदोव व रशियाचा डेनिस किसमातुलिन यांनी त्याच्यावर विजय मिळविला. स्पर्धेतील आव्हान टिकविण्याचे मोठे आव्हान आनंदसमोर असेल.
रशियाच्या ब्लादीमिर बेलोव व युक्रेनच्या आंद्रेई वोलोकितीन यांना नमवीत आनंदने चांगली सुरुवात केली. मात्र, आठव्या फेरीत आनंदला मामेदोव याने पराभूत केले. त्यानंतर मोलडोवाच्या व्हिक्टर बोलागन याला नमवीत त्याने पुन्हा स्पर्धेत पुनरागमन केले. मात्र, डेनिसविरुद्ध पुन्हा
पराभव पत्करावा लागला. आनंदचे ५.५ गुण झाले आहेत. त्याला पोडियम फिनिश करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. अजिंक्यपद स्पर्धेच्या ५ फेऱ्या शिल्लक आहेत. आनंदला या सर्व फेऱ्यांत बाजी मारावी लागेल; तरच तो तांत्रिकदृष्ट्या विजेतेपदाच्या शर्र्यतीत राहू शकतो.
जलदगती बुद्धिबळ स्पर्धेतील गतविजेता नॉर्वेचा मॅग्नस कार्लसन व बेलारूसचा सर्जेई झिगाल्को याने ८ गुणांसह आघाडी घेतली आहे. कार्लसन याची कामगिरी ३ विजेतेपद व २ बरोबरी अशी आहे. भारताचा विदीत गुजराती केवळ दीड गुण मिळवू शकला आहे. के. शशिकिरणचे साडेपाच, तर एसपी सेतूरामनयाचे साडेतीन गुण झाले आहेत.

Web Title: Anand returns to double defeat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.