आनंदने स्विडलरसोबत ड्रॉ खेळला

By Admin | Updated: October 5, 2016 20:44 IST2016-10-05T20:44:31+5:302016-10-05T20:44:31+5:30

पाच वेळेसचा वर्ल्डचॅम्पियन विश्वनाथन आनंद मिळालेल्या संधीचा लाभ घेऊ शकला नाही, त्यामुळे त्याला येथे १0 व्या ताल मेमोरियल आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत सातव्या फेरीत

Anand played a draw with Swidler | आनंदने स्विडलरसोबत ड्रॉ खेळला

आनंदने स्विडलरसोबत ड्रॉ खेळला

>ऑनलाइन लोकमत
मॉस्को, दि. 05 -  पाच वेळेसचा वर्ल्डचॅम्पियन विश्वनाथन आनंद मिळालेल्या संधीचा लाभ घेऊ शकला नाही, त्यामुळे त्याला येथे १0 व्या ताल मेमोरियल आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत सातव्या फेरीत रशियाच्या पीटर स्विडलरसोबतची लढत ड्रॉवर सोडवावी लागली.
आजचा दिवस निरस ठरला आणि दोन लाख डॉलर बक्षीस रकमेच्या या स्पर्धेतील सर्व सामने ड्रॉ झाले.
रशियाचा इयान नेपोमनियाचीने ४.५ गुणांसह आपली आघाडी कायम ठेवली आहे, तर नेदरलँडचा अनिष गिरी अर्ध्या गुणाने पिछाडीवर असून, तो दुसºया स्थानी आहे.
आनंद, रशियाचा व्लादिमीर क्रॅमनिक आणि आर्मेनियाचा लेवोन अरोनियन संयुक्तरीत्या तिसºया स्थानावर आहेत.
स्विडलर आणि चीनचा ली चाओ ३.५ गुणांसह संयुक्तरीत्या सहाव्या स्थानावर आहे. शखरियार मामदयारोव्ह तीन गुणांसह सहाव्या स्थानावर, तर रशियाचा येवगनी तोमशेवस्की २.५ गुणांसह नवव्या स्थानावर आहे. इस्रायलचा बोरीस गेलफेंड १ गुणासह दहाव्या आणि अखेरच्या क्रमांकावर आहे.

Web Title: Anand played a draw with Swidler

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.