पायाने बाण मारुन जिंकले GOLD; महिंद्रांनी केले कौतुक, म्हणाले- तुला हवी ती गाडी देणार...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2023 01:30 PM2023-10-29T13:30:29+5:302023-10-29T13:31:48+5:30

Anand Mahindra Viral Post : पायाने बाण मारुन देशासाठी सुवर्णपदक जिंकणाऱ्या शीतल देवीसाठी आनंद महिंद्रा यांनी खास पोस्ट केली आहे.

Anand Mahindra Viral Post : shital devi Wins GOLD in para games, Anand Mahindra praised, said - 'I will give you the car you want...' | पायाने बाण मारुन जिंकले GOLD; महिंद्रांनी केले कौतुक, म्हणाले- तुला हवी ती गाडी देणार...

पायाने बाण मारुन जिंकले GOLD; महिंद्रांनी केले कौतुक, म्हणाले- तुला हवी ती गाडी देणार...

Anand Mahindra Viral Post : महिंद्रा अँड महिंद्रा ग्रुपचे अध्यक्ष आनंद महिंद्रा (Anand Mahindra) सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असतात. महिंद्रा नेहमीच मनोरंजक आणि प्रेरणा देणाऱ्या पोस्ट करतात. त्यांच्या पोस्टवर नेटकरीदेखील भरभरुन लाईक्स आणि कमेंट्स करतात. आता त्यांची ताजी पोस्ट चर्चेत आली आहे. त्यांनी आशियाई पॅरा गेम्समध्ये दोन सुवर्णपदके जिंकणाऱ्या तिरंदाज शीतल देवी (Sheetal Devi) यांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

पायाने बाण चालवून जिंकले 'गोल्ड'
आनंद महिंद्रांना खेळांमध्ये खूप रस आहे, मग क्रिकेट असो किंवा इतर कुठलाही खेळ असो. खेळाडूंच्या यशाबद्दल ते नेहमीच सोशल मीडियाद्वारे प्रतिक्रिया देतात. यापूर्वी त्यांनी देशासाठी पदक जिंकणाऱ्या अनेक खेळाडूंना महिंद्रा कंपनीची गाडी भेट दिली आहे. आता यावेळी त्यांनी शीतल देवींनाही गाडी देण्याची घोषणा केली आहे. 

काय म्हणाले आनंद महिंद्रा?
आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या पोस्टमध्ये शीतल देवीचा व्हिडिओ शेअर करताना लिहिले की, 'आता मी माझ्या आयुष्यातील छोट्या छोट्या समस्यांबद्दल कधीही तक्रार करणार नाही. शीतलदेवी, तू आम्हा सर्वांसाठी शिक्षिकेप्रमाणे आहेस. आमच्या कंपनीची कोणतीही गाडी निवड, तुझ्या वापरानुसार आम्ही मॉडिफाय करुन तुला भेट देऊ,' अशी पोस्ट महिंद्रांनी केली.

पोस्टवर नेटकऱ्यांच्या कमेंट्स
आनंद महिंद्रांच्या प्रत्येक सोशल मीडिया पोस्टप्रमाणे ही पोस्टही व्हायरल होत आहे. महिंद्राांनी शीतल देवी यांना दिलेल्या खास भेटीचेही लोक कौतुक करत आहेत. एका यूजरने कमेंट केली, 'काहीही अशक्य नाही, शीतल देवी यांनी हे सिद्ध केले आहे. त्या देशातील चमकता तारा आहेत.' या पोस्टला 1.5 मिलियन+ व्ह्यूज मिळाले आहेत. 

Web Title: Anand Mahindra Viral Post : shital devi Wins GOLD in para games, Anand Mahindra praised, said - 'I will give you the car you want...'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.