आनंद-अरोनियन लढत अनिर्णीत

By Admin | Updated: December 6, 2015 23:25 IST2015-12-06T23:25:09+5:302015-12-06T23:25:09+5:30

माजी वर्ल्ड चॅम्पियन विश्वनाथन आनंद आणि आर्मेनियाचा लेवोन अरोनियन यांच्या सोबतची लंडन क्लासिक बुद्धिबळ स्पर्धेची दुसरी फेरी ड्रॉ राहिली.

Anand-Aronian fight drawn | आनंद-अरोनियन लढत अनिर्णीत

आनंद-अरोनियन लढत अनिर्णीत

लंडन : माजी वर्ल्ड चॅम्पियन विश्वनाथन आनंद आणि आर्मेनियाचा लेवोन अरोनियन यांच्या सोबतची लंडन क्लासिक बुद्धिबळ स्पर्धेची दुसरी फेरी ड्रॉ राहिली.
आनंदच्या दोन लढतीही ड्रॉ ठरल्या असून, त्याचा एक गुण झाला आहे. आता उर्वरित सात फेऱ्यांपैकी आनंदला चार वेळेस पांढऱ्या मोहऱ्यांनिशी खेळावे लागणार आहे. भारताच्या या दिग्गज खेळाडूला तिसऱ्या फेरीत नॉर्वेच्या गत वर्ल्ड चॅम्पियन मॅग्नस कार्लसनशी दोन हात करावे लागणार आहेत. आज सर्वच्या सर्व पाचही लढती बरोबरीत सुटल्या. नेदरलँडच्या अनिष गिरीने इंग्लंडच्या मायकल अ‍ॅडम्सशी, तर कार्लसनने अमेरिकेच्या फाबियो करुआनाशी ड्रॉ खेळला. रशियाचा एलेक्झांडर ग्रिश्चुक आणि बुल्गारियाच्या वेस्लीन टोपोलोव्ह यांच्यातील डावही बरोबरीत सुटला. दिवसातील सर्वांत रोमहर्षक लढतीत फ्रान्सचा मॅक्सिम वाचियेर लाग्रेव्हने अमेरिकेच्या हिकारू नाकामुरा याच्याविरुद्ध विजयाची आशा उंचावली; मात्र डाव बरोबरीत राहिला.

Web Title: Anand-Aronian fight drawn

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.