अलीम दार यांना हटविण्याच्या निर्णयाचे आश्चर्य - रमीज
By Admin | Updated: October 23, 2015 01:33 IST2015-10-23T01:33:03+5:302015-10-23T01:33:03+5:30
पाकिस्तानचा माजी कर्णधार रमीज राजा याने पाकिस्तानी पंच अलीम दार यांना भारत व दक्षिण आफ्रिका मालिकेतून हटविण्याच्या आयसीसीच्या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केले आहे.

अलीम दार यांना हटविण्याच्या निर्णयाचे आश्चर्य - रमीज
पाकिस्तानचा माजी कर्णधार रमीज राजा याने पाकिस्तानी पंच अलीम दार यांना भारत व दक्षिण आफ्रिका मालिकेतून हटविण्याच्या आयसीसीच्या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केले आहे.
शिवसेना कार्यकर्ते बीसीसीआयचे अध्यक्ष शशांक मनोहर यांच्या कार्यालयात घुसल्यानंतर पीसीबी अध्यक्ष शहरयार खान यांच्याशी होणारी चर्चा रद्द करावी लागल्यानंतर, आयसीसीने सोमवारी पाकिस्तानी पंच अलीम दार यांना भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान सुरू असलेल्या वनडे मालिकेच्या अखेरच्या दोन सामन्यांतून हटविण्याचा निर्णय घेतला होता.
रमीज राजा म्हणाला की, ‘असे करून आयसीसी सर्वांना काय संदेश देऊ इच्छिते याचे कोडे मला कळत नाही. बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांना भारतात पंच अलीम दर यांची सुरक्षा ठेवण्यासाठी आयसीसी सांगेल, असे वाटले होते. विशेष म्हणजे पुढील वर्षी भारताच्या विविध शहरांत टी-२0 वर्ल्डकपचे सामने होणार आहेत. त्यामुळे त्यांचे धोरण आपल्याला समजत नाही. आयसीसीने सोपा मार्ग निवडला, परंतु कोणत्याही मालिकेदरम्यान सर्वच सामना अधिकाऱ्यांना सुरक्षा निश्चित करण्याची आयसीसीची जबाबदारी आहे.’
दरम्यान, पाकिस्तानचे माजी पंच असद रऊफ यांनी दार यांना धोक्याच्या कारणांमुळे आयसीसीने हा निर्णय घेतला असेल. दार यांच्या सुरक्षितेविषयी आयसीसीला चिंता नसेल, तर ते त्यांना वापस का पाठवतील, असा प्रश्न उपस्थित केला.