साक्षी मलिकला सरकारने नाही दिली बक्षीसाची रक्कम
By Admin | Updated: March 4, 2017 19:12 IST2017-03-04T19:12:03+5:302017-03-04T19:12:03+5:30
हरियाणा सरकारतर्फे जाहीर करण्यात आलेल्या प्रोत्साहन पारितोषकाची रक्कम अद्याप मिळालेली नाही, असे ऑलिम्पिक कांस्य पदक विजेती महिला मल्ल साक्षी मलिकने स्पष्ट केले.

साक्षी मलिकला सरकारने नाही दिली बक्षीसाची रक्कम
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 4 - रिओ ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक पदक पटकावल्यानंतर हरियाणा सरकारतर्फे जाहीर करण्यात आलेल्या प्रोत्साहन पारितोषकाची रक्कम अद्याप मिळालेली नाही, असे ऑलिम्पिक कांस्य पदक विजेती महिला मल्ल साक्षी मलिकने स्पष्ट केले.
साक्षीने टि्वट केले की,‘पदक पटकावण्याचे आश्वासन मी पूर्ण केले, पण हरियाणा सरकार आपले आश्वासन कधी पूर्ण करणार. मी ऑलिम्पिकमध्ये पदक पटकावल्यानंतर हरियाणा सरकारतर्फे केलेली घोषणा केवळ मीडियासाठी होती ? ’ साक्षीने ५८ किलो फ्रीस्टाईलमध्ये गेल्या वर्षी रिओ ऑलिम्पिकमध्ये पदक पटकावले होते.
भारतातर्फे ऑलिम्पिकमध्ये पदक पटकावणारी ती पहिला महिला मल्ल ठरली होती. या ऐतिहासिक कामगिरीनंतर हरियाणा सरकारने किमान ३.५ कोटी रुपयांच्या प्रोत्साहन व नगदी पुरस्कारांची घोषणा केली होती. ऑलिम्पिकपूर्वी हरियाणा सरकारने सुवर्णपदक पटकावणा-या राज्यातील खेळाडूंना सहा कोटी, रौप्य पदक पटकाणा-या खेळाडूंना चार कोटी तर कांस्यपदक पटकावणा-या खेळाडूंना २.५ कोटी रुपये देण्याची घोषणा केली होती.