आमलाची शतकी खेळी, मुंबईला 199 धावांचं आव्हान
By Admin | Updated: April 20, 2017 22:15 IST2017-04-20T21:53:39+5:302017-04-20T22:15:34+5:30
फलंदाज हाशिम आमलाच्या शानदार फटकेबाजीच्या जोरावर किंग्ज इलेव्हन पंजाबने मुंबई इंडियन्सला 20 षटकात 199 धावांचे आव्हान दिले आहे.

आमलाची शतकी खेळी, मुंबईला 199 धावांचं आव्हान
>ऑनलाइन लोकमत
इंदोर, दि. 20 - फलंदाज हाशिम आमलाच्या शानदार फटकेबाजीच्या जोरावर किंग्ज इलेव्हन पंजाबने मुंबई इंडियन्सला 20 षटकात 199 धावांचे आव्हान दिले आहे. या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबने 20 षटकात चार गड्यांच्या मोबदल्यात 198 धावा केल्या.
फलंदाज हाशिम आमला याने शतकी खेळी करत किंग्ज इलेव्हन पंजाबच्या धावसंख्येत मोठी भर घातली. हाशिम आमलाने 60 चेंडूत सहा षटकार आणि आठ चौकारांची तडफदार खेळी करत नाबाद 104 धावा केल्या. तर ग्लेन मॅक्लवेलने 18 चेंडूत तीन षटकार आणि चार चौकार लगावत 40 धावा कुटल्या. ग्लेन मॅक्सवेलला गोलंदाज जसप्रीत बुमराहने त्रिफळाचीत केले. शॉन मार्शने 26 आणि रिद्धीमान साहाने 11 धावा काढल्या. मारक्युस स्टोइनीस अवघ्या एका धावेवर बाद झाला. तर अक्षर पटेलने नाबाद 4 धावांची खेळी केली.
मुंबई इंडियन्सकडून गोलंदाज मिशेल मॅक्लनघन याने दोन बळी घेतले, तर कृणाल पंड्या आणि जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी एक बळी टिपला.