शंभराव्या कसोटीत विजयाची भेट अपेक्षित : आमला
By Admin | Updated: November 14, 2015 01:12 IST2015-11-14T01:12:35+5:302015-11-14T01:12:35+5:30
एबी डिव्हिलियर्स कारकिर्दीतील १००वा कसोटी सामना खेळण्यासाठी सज्ज झाला आहे; पण त्यामुळे या स्टार फलंदाजाचे लक्ष विचलित होणार नसून, ४ कसोटी सामन्यांच्या

शंभराव्या कसोटीत विजयाची भेट अपेक्षित : आमला
बंगळुरू : एबी डिव्हिलियर्स कारकिर्दीतील १००वा कसोटी सामना खेळण्यासाठी सज्ज झाला आहे; पण त्यामुळे या स्टार फलंदाजाचे लक्ष विचलित होणार नसून, ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेत संघाला बरोबरी साधून देण्यासाठी तो महत्त्वाचे योगदान देईल, असा विश्वास दक्षिण आफ्रिका संघाचा कर्णधार हाशीम आमलाने व्यक्त केला.
शनिवारपासून प्रारंभ होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेत बोलताना आमला म्हणाला, ‘‘डिव्हिलियर्स कारकिर्दीतील १००वा कसोटी सामना खेळणार असला, तरी त्याचे लक्ष विचलित होणार नाही. एबी शनिवारी मैदानावर शानदार कामगिरी करेल आणि आम्हाला सामना जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल, हे एबी व आमच्यासाठी आदर्श लढत ठरेल. आम्हाला यापूर्वीच्या लढतीत पराभव स्वीकारावा लागला होता. आमच्यासाठी शनिवारपासून सुरू होणाऱ्या कसोटी सामन्यावर लक्ष केंद्रित करणे कठीण बाब नाही.’’
डिव्हिलियर्सबाबत आमला म्हणाला, ‘‘आमच्या देशासाठी १०० कसोटी सामने मोठी उपलब्धी आहे. संघ म्हणून आम्ही त्याचा पुरेपूर आनंद घेणार आहोत. एबी कारकिर्दीतील १००वा सामना खेळणार आहे. दक्षिण आफ्रिका संघासाठी ही मोठी उपलब्धी आहे. आम्ही या क्षणाचा आनंद साजरा करण्यास इच्छुक आहोत.’’
फिरकीपटूंना अनुकूल खेळपट्ट्यांबाबत सुरू असलेल्या चर्चेचा नकारात्मक परिणाम झाला का, याबाबत आमला म्हणाला, ‘‘चेंडू कमी स्पिन होत असल्यामुळे आम्ही अडचणीत आलो. बंगळुरूतील खेळपट्टी मोहालीप्रमाणे नसेल अशी अपेक्षा करतो.