महिलेला मारहाण केल्याप्रकरणी अमित मिश्रावर गुन्हा दाखल
By Admin | Updated: October 20, 2015 20:16 IST2015-10-20T20:16:42+5:302015-10-20T20:16:42+5:30
भारतीय क्रिकेटपटू लेगस्पिनर अमित मिश्रा याच्याविरोधात महिलेला मारहाण केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महिलेला मारहाण केल्याप्रकरणी अमित मिश्रावर गुन्हा दाखल
ऑनलाईन लोकमत
बेंगळुरु, दि.२० - भारतीय क्रिकेटपटू लेगस्पिनर अमित मिश्रा याच्याविरोधात महिलेला मारहाण केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिडीत महिलेने मागील महीन्यात अशोक नगर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली आहे. सप्टेंबरमध्ये हा प्रकार घडल्याचा आरोप करण्यात आला आहे. बेंगळुरु पोलिसांनी अमित मिश्राला समन्स पाठवला आहे, त्याला सात दिवसांत हजर होण्यास सांगितले आहे. त्याच्यावर IPC कलम ३५४ आणि ३२८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सध्य अमित मिश्रा द. आफ्रिका बरोवरच्या एकदिवसिय मालिकेत खेळत आहे. त्याची द. आफ्रिकाबरोबरच्या कसोटी मालिकेसाठीही निवड झाली आहे. BCCI आणि अमित यावर काय भुमिका घेतात हे महत्वाचे आहे.