अमेरिकेचा पुरुष बास्केटबॉल संघ राहतो पंचतारांकित क्रुजवर ..
By Admin | Updated: August 6, 2016 13:01 IST2016-08-06T06:56:29+5:302016-08-06T13:01:33+5:30
अमेरिकेचा पुरूषांच्या बास्केटबॉल संघ क्रीडाग्राममधील व्यवस्था समाधानकारक नाही. यामुळे अलिशान पंचतारांकित क्रुजवर राहात आहे.

अमेरिकेचा पुरुष बास्केटबॉल संघ राहतो पंचतारांकित क्रुजवर ..
शिवाजी गोरे, रिओ दी जानेरो -
रिओ, दि. 6 - 18 पैकी 15 ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलेला अमेरिकेचा पुरूषांच्या बास्केटबॉल संघ क्रीडाग्राममधील व्यवस्था समाधानकारक नाही. यामुळे अलिशान पंचतारांकित क्रुजवर राहात आहे. हा संघ गेली पाच दिवस रोज सुमद्रातून रिया शहरात त्याच्या सरावाच्या वेळी क्रुजने येतो आणि सराव संपल्यानंतर पुन्हा रियोपासून लांब समुद्रातील आंतरराष्ट्रीय हद्दीत जातो. अमेरिकेच्या या संघाने पहिल्या दिवसापासून क्रीडाग्राममध्ये राहण्यास नकार दिला होता.