अमेरिका, जपान, फ्रान्स सराव सामन्यात विजयी

By Admin | Updated: May 29, 2014 04:37 IST2014-05-29T04:37:53+5:302014-05-29T04:37:53+5:30

आगामी काळापासून येथे खेळवल्या जाणार्‍या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या तयारी निमित्त आयोजित सराव सामन्यात अमेरीका, फ्रान्स आणि जपानच्या संघांनी विजय मिळवला. या सामन्यांना प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला

America, Japan, France won the practice match | अमेरिका, जपान, फ्रान्स सराव सामन्यात विजयी

अमेरिका, जपान, फ्रान्स सराव सामन्यात विजयी

ब्राजील : आगामी काळापासून येथे खेळवल्या जाणार्‍या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या तयारी निमित्त आयोजित सराव सामन्यात अमेरीका, फ्रान्स आणि जपानच्या संघांनी विजय मिळवला. या सामन्यांना प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला. अमेरिकेच्या संघाने आजच्या कैंडलस्टिक पार्क येथील सामन्यात अजरबेजान संघाला २ विरूद्ध ० अशा फरकाने सहज पराभूत केले.तर पॅरीस येथे खेळल्या गेलेल्या एका अभ्यास सामन्यात फ्रांसच्या संघाने नार्वे संघाचा पाडाव करतांना त्यांना ४ विरुद्ध ० अशा फरकाने हरवले. फ्रांसच्या मैथ्यू वालबूएनाने सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करतांना ३ गोल केले. फ्रांस संघाचे प्रशिक्षक डिडिलियर डेशैंप यांनी अांतररार्ष्ट्रीय सामन्यात चार गोल करणे ही सहज बाब नसल्याचे स्पष्ट केले. या प्रदर्शनामुळे विश्वकप स्पर्धेच्या आधी संघाचा आत्मविश्वास वाढण्यास मदत मिळाल्याचे ते म्हणाले. अन्य सामन्यात अमेरिकेच्या मिक्स डिस्क्रुड याने सामन्याच्या ७५ व्या मिनटाला गोल करत संघाला आघाडी मिळवून दिल्यानंतर एरन जोहानसनने आणखी १ गोल करत संघाला विजय मिळवून दिला. या शिवाय साइतामा येथे खेळल्या गेलेल्या अभ्यास सामन्यात जपानने साइप्रसच्या एकमात्र गोलच्या आधारे सहज विजय मिळवला.

Web Title: America, Japan, France won the practice match

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.