सचिन, मिल्खा सिंह यांना दूत करा : परगत

By Admin | Updated: April 26, 2016 00:16 IST2016-04-26T00:16:35+5:302016-04-26T00:16:35+5:30

जालंधर : ऑलिम्पिक स्पर्धेसाठी चित्रपट अभिनेता सलमान खान याला सद्भावना दूत बनवण्याच्या निर्णयावर टीका करताना माजी हॉकी संघाचा कर्णधार परगतसिंह याने खेळाशी निगडित प्रकरणात खेळाडूवरच ही जबाबदारी सोपवायला हवी आणि यासाठी देशात मिल्खासिंह आणि सचिन तेंडुलकर हे सर्वात योग्य आहेत, असे सांगितले.

Ambassador Sachin, Milkha Singh: Parvat | सचिन, मिल्खा सिंह यांना दूत करा : परगत

सचिन, मिल्खा सिंह यांना दूत करा : परगत

लंधर : ऑलिम्पिक स्पर्धेसाठी चित्रपट अभिनेता सलमान खान याला सद्भावना दूत बनवण्याच्या निर्णयावर टीका करताना माजी हॉकी संघाचा कर्णधार परगतसिंह याने खेळाशी निगडित प्रकरणात खेळाडूवरच ही जबाबदारी सोपवायला हवी आणि यासाठी देशात मिल्खासिंह आणि सचिन तेंडुलकर हे सर्वात योग्य आहेत, असे सांगितले.
चित्रपट अभिनेता सलमान खान याला रिओ ऑलिम्पिकसाठी सद्भावना दूत बनवण्यात आले आहे. ऑलिम्पियन ते राजकीय नेता बनलेल्या परगतसिंहने भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या या निर्णयावर टीका केली. तो म्हणाला, 'खेळाशी निगडित असलेल्या कोणत्याही आदर्श खेळाडूला सद्भावना दूत बनवायला हवे. जे खेळाशी संबंधित नाहीत अथवा चित्रपट अभिनेता यांना अशा स्थानावर नियुक्त करायला नको.'
विजेंदरशी भारतात मुकाबला करायचा : आमिर
सॅन फ्रॅन्सिस्को : पाकिस्तानी वंशाचा ब्रिटिश प्रोफेशनल बॉक्सर आमिर खान याने स्टार भारतीय मुष्टियोद्धा विजेंदरसिंहविरुद्ध भारतातच मुकाबला करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
मेक्सिकोच्या केनेलो अल्वारेजविरुद्ध बहुप्रतीक्षित डब्ल्यूबीसी मिडलवेट विजेतेपदाच्या लढतीची तयारी करीत असलेल्या आमिरने म्हटले, 'मी भारतात जागतिक स्तरावरील मुष्टियोद्धे तयार करू इच्छितो. भारत आणि पाकिस्तानच्या लोकांत नैसर्गिकरीत्या बॉक्सिंग आणि कुस्तीसारख्या खेळात चांगली कामगिरी करण्याची क्षमता आहे. भारताजवळ प्रोफेशनल बॉक्सिंगमध्ये विजेंदरसारखी अनोखी प्रतिभा आहे आणि मी त्याच्याविरुद्ध भारतातच लढू इच्छितो.'

Web Title: Ambassador Sachin, Milkha Singh: Parvat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.