ॅहॉकी सहभाग
By Admin | Updated: August 28, 2014 20:55 IST2014-08-28T20:55:38+5:302014-08-28T20:55:38+5:30
सोलापुरातील सहस्रार्जुन प्रशाला, इंडियन मॉडेल स्कूल, सिद्धेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल, सेंट जोसेफ हायस्कूल, दी प्रोग्रेसिव्ह, सोशल, पानगल, जय जवान जय किसान सैनिकी शाळा, संगमेश्वर व वालचंद कॉलेज येथे मोठय़ा प्रमाणावर हॉकीचा प्रसार व प्रचार होत असून, येथून दरवर्षी अनेक नवनवीन उदयोन्मुख खेळाडू घडताना दिसून येत आहेत़ जिल्?ातील अक्कलकोट, मोडनिंब, मैंदर्गी, बार्शी येथेही हॉकीचा विकास होत आह़े

ॅहॉकी सहभाग
स लापुरातील सहस्रार्जुन प्रशाला, इंडियन मॉडेल स्कूल, सिद्धेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल, सेंट जोसेफ हायस्कूल, दी प्रोग्रेसिव्ह, सोशल, पानगल, जय जवान जय किसान सैनिकी शाळा, संगमेश्वर व वालचंद कॉलेज येथे मोठय़ा प्रमाणावर हॉकीचा प्रसार व प्रचार होत असून, येथून दरवर्षी अनेक नवनवीन उदयोन्मुख खेळाडू घडताना दिसून येत आहेत़ जिल्?ातील अक्कलकोट, मोडनिंब, मैंदर्गी, बार्शी येथेही हॉकीचा विकास होत आह़े0000000000स्टेपिंग स्टाईल बघून कुरेशी यांनी हेरले विटी-दांडू खेळणार्या खेळाडूंनामैदानावर विटी-दांडू खेळावयास आजूबाजूने अनेक मुले येत असत़ त्यापैकी एक-दोन मुले अशी होती की त्यांची स्टेपिंग स्टाईल हॉकीला पोषक होती़ जरार कुरेशी यांनी मैदानावर हॉकीचा सराव घेत असताना विटी-दांडू खेळताना पळणार्या त्या मुलांकडे पाहिले आणि त्यांचा पाठलाग करून त्यांना घरातून पकडून आणल़े हॉकीचे योग्य प्रशिक्षण देऊन त्यांना हॉकी संघात समाविष्ट करून घेतल़े पवन क्षीरसागर, अजय चाबुकस्वार हे दोन असे खेळाडू होते की, त्यांच्यातील स्टेपिंग स्टाईल हॉकीसाठी अगदी पोषक होती़ त्यांची स्टाईल नॅचरल होती़ ते केवळ एकट्याच्या जोरावर आपल्या संघाला विजय मिळवून देत असत; मात्र ते खेळाडू तेव्हा जर क्रीडा प्रबोधिनीत दाखल झाले असते तर आज राष्ट्रीय संघातील सदस्यदेखील राहिले असते, अशी खंत जरार कुरेशी व अब्दुल करीम सय्यद यांनी व्यक्त करून दाखवली़000000000000000000000000000000000साहित्य महागडे; मात्र कष्टाचा खेळआज हॉकीचे साहित्य महागडे आहेत़ कमीत कमी एका खेळाडूला 2 हजार रुपयांचा खर्च येतो़ पॅड, स्टिक, बॉल, शीन पॅड, शूज, अँबनॉडन्ड गार्ड यासारखे साहित्य गरजेचे असून, हे सर्व साहित्य महागडे आह़े