अमरनाथ पुन्हा निवड समिती अध्यक्षपदी?

By Admin | Updated: August 7, 2015 22:30 IST2015-08-07T22:30:43+5:302015-08-07T22:30:43+5:30

विश्वविजेत्या (१९८३) भारतीय संघाचे सदस्य, माजी अष्टपैलू खेळाडू मोहिंदर अमरनाथ हे मुख्य राष्ट्रीय निवडकर्ते बनण्याची दाट शक्यता आहे

Amarnath is the chairman of the selection committee again? | अमरनाथ पुन्हा निवड समिती अध्यक्षपदी?

अमरनाथ पुन्हा निवड समिती अध्यक्षपदी?

मुंबई : विश्वविजेत्या (१९८३) भारतीय संघाचे सदस्य, माजी अष्टपैलू खेळाडू मोहिंदर अमरनाथ हे मुख्य राष्ट्रीय निवडकर्ते बनण्याची दाट शक्यता आहे.
मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार माजी क्रिकेटपटू लाला अमरनाथ यांचे पुत्र असलेले मोहिंदर हे आधीही निवड समिती सदस्य होते पण २०१२ साली त्यांची वादग्रस्तरीत्या उचलबांगडी करण्यात आली. इंग्लंड तसेच आॅस्ट्रेलियाविरुद्ध सलग आठ कसोटी सामने गमावल्यानंतर अमरनाथ यांनी महेंद्रसिंग धोनी याला कर्णधारपद सोडण्याचा सल्ला दिला होता. बीसीसीआयचे तत्कालीन अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी अमरनाथच्या सल्ल्याचा विचार तर केला नाहीच शिवाय त्यांची चक्क उचलबांगडी केली. धोनीने डिसेंबर २०१४ मध्ये आॅस्ट्रेलियाविरुद्ध पहिली कसोटी गमावताच कर्णधारपद सोडले होते.
धोनीबद्दल अमरनाथ त्यावेळी म्हणाले, ‘धोनी हा प्रतिस्पर्धी संघाला सामन्यात परतण्याची संधी देणारा कर्णधार आहे. अन्य कर्णधारांसारखाच धोनीचा देखील मायदेशात रेकॉर्ड चांगलाच आहे. यात काही वेगळे नाही. परदेशात सामने जिंकायचे असतील तर मन्सूर अली खानसारखाच कर्णधार असावा.’’
‘माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांची देखील निवड समितीत सदस्य बनण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मुंबई क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष असलेले वेंगसरकर हे २००६ ते २००८ दरम्यान भारतीय संघात सेवा देत होते. (वृत्तसंस्था)

Web Title: Amarnath is the chairman of the selection committee again?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.