शहरं
Join us  
Trending Stories
1
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
2
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
3
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
4
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
5
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
6
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
7
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
8
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
9
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
10
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
11
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
12
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
13
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
14
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
15
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
16
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
17
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
18
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
19
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको
20
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश

अमनची अजिंक्यपदी झेप

By admin | Updated: October 24, 2016 05:01 IST

ठाण्याच्या अमन फारूख संजयने महाराष्ट्राच्या रोहन गुर्बानीचा २-० असा धुव्वा उडवला. या विजयाच्या जोरावर क्रिष्णा खैतान स्मृती अखिल भारतीय बॅडमिंटन स्पर्धेत एकेरी

मुंबई : ठाण्याच्या अमन फारूख संजयने महाराष्ट्राच्या रोहन गुर्बानीचा २-० असा धुव्वा उडवला. या विजयाच्या जोरावर क्रिष्णा खैतान स्मृती अखिल भारतीय बॅडमिंटन स्पर्धेत एकेरी गटात विजेतेपदाला गवसणी घातली. तब्बल १० वर्षांनी ठाणेकरांनी अमनच्या रूपाने राष्ट्रीय एकेरीचे विजेतेपद पटकावले. चंदीगड येथे झालेल्या स्पर्धेत अंतिम फेरीत अमन विरुद्ध रोहन यांच्यात चुरशीचा सामना पार पडला. अमनने आक्रमक स्मॅशचा प्रभावी वापर करत उपस्थितांची वाहवा मिळवली. पहिल्या सेटमध्ये अमनने २१-१७ अशा फरकाने विजय मिळवत सामन्यात १-० अशी आघाडी घेतली. दुसऱ्या सेटमध्ये मात्र महाराष्ट्राच्या रोहनने कडवी झुंज दिली. अमननेदेखील चोख प्रत्युत्तर दिले. शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या सामन्यात अमनने २२-२० अशा फरकाने बाजी मारत स्पर्धेच्या विजेतेपदाला गवसणी घातली. तत्पूर्वी उपांत्य फेरीत अमनने गोपीचंद अकादमीच्या आंध्र प्रदेशच्या डी. जसवंतवर २१-१५, १६-२१, २१-१५ अशी मात केली. सामन्यातील १-१ अशा बरोबरीनंतर निर्णायक गेममध्ये अमनने दिमाखदार खेळाचे प्रदर्शन करत अंतिम फेरी गाठली.ठाणे महापालिकेच्या सय्यद मोदी बॅडमिंटन प्रशिक्षण योजनेत अमनने बॅडमिंटनचे धडे गिरवले. दुहेरीत ठाणेकर खेळाडूंनी अनेक अजिंक्यपद पदके मिळवली आहेत.मात्र एकेरीचे अजिंक्यपद मिळविण्यासाठी तब्बल १० वर्षांचा काळ लोटला. अमनच्या अथक परिश्रमाने ठाणे शहराला एकेरीत अजिंक्यपद मिळाले आहे. ठाणे बॅडमिंटन अकादमीच्या वतीने त्यास इंडोनेशिया येथे पाठविण्यात आले आहे. माजी जगज्जेता ई. सुगियारतो यांच्या मार्गदर्शनाखाली तो एक महिना बॅडमिंटनमधील बारकावे आत्मसात करणार आहे. आगामी उडिपी येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेतही तो विजयाची पुनरावृत्ती करेल, असा विश्वास प्रशिक्षक श्रीकांत वाड यांनी व्यक्त केला. ठाणे सय्यद मोदी बॅडमिंटन प्रशिक्षण योजनेतील अन्य खेळाडू देखील राष्ट्रीय आणि राज्य स्पर्धेत पदकांची कमाई करत आहे. चंदीगड येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत १५ वर्षांखालील गटात ठाण्याच्या रोहन स्थूलने पात्रता फेरी गाठली. रत्नागिरी येथील राज्य अजिंक्यपद स्पर्धेत रोहनने विजेतेपदावर नाव कोरले. अकादमीच्या ईशान नक्वीने पश्चिम विभागीय आंतरराज्य स्पर्धेत महाराष्ट्राच्या विजयात मोलाची कामगिरी बजावली होती. (क्रीडा प्रतिनिधी)