अल्विरो पीटरसनवर दोन वर्षांची बंदी
By Admin | Updated: December 23, 2016 01:31 IST2016-12-23T01:31:55+5:302016-12-23T01:31:55+5:30
द. अफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू अल्विरो पीटरसन याच्यावर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. भ्रष्टाचाराच्या प्रकरणात त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली.

अल्विरो पीटरसनवर दोन वर्षांची बंदी
जोहान्सबर्ग : द. अफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू अल्विरो पीटरसन याच्यावर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. भ्रष्टाचाराच्या प्रकरणात त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली. ही बंदी १२ नोव्हेंबरपासून लागू राहील.
दक्षिण अफ्रिकेसाठी ३६ कसोटी सामने खेळलेल्या पीटरसनवर बुधवारी ही बंदी लावण्यात आली. भ्रष्टाचाराच्या आरोपात बंदीची शिक्षा भोगणारा पीटरसन हा सहावा खेळाडू आहे. पीटरसन याने मान्य केले की, ‘‘सीएसएने लागू केलेल्या भ्रष्टाचारविरोधी आचारसंहितेचे उल्लंघन केले आहे.’’
सीएसएने प्रसिद्ध केलेल्या वक्तव्यात पीटरसनच्या हवाल्याने म्हटले आहे की,‘‘ मी परिवार, मित्र आणि जनतेची माफी मागतो मला आशा आहे की इतर खेळाडू माझ्या अनुभवातून शिकतील.’’