सर्व कर्णधार व्यासपीठावर

By Admin | Updated: February 13, 2015 00:46 IST2015-02-13T00:46:25+5:302015-02-13T00:46:25+5:30

:समारंभाला आजी-माजी खेळाडूंसोबत ८० बालके होती. या वेळी सहभागी १४ देशांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या १४ मैदानांना ४ विभागांत विभागण्यात येऊन

All the captain on the platform | सर्व कर्णधार व्यासपीठावर

सर्व कर्णधार व्यासपीठावर

ख्राईस्टचर्च :समारंभाला आजी-माजी खेळाडूंसोबत ८० बालके होती. या वेळी सहभागी १४ देशांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या १४ मैदानांना ४ विभागांत विभागण्यात येऊन प्रतीकात्मक क्रिकेट खेळविण्यात आले. सर्व चारही विभागांपुढे व्यासपीठ बनविण्यात आले होते.
या व्यासपीठावर भारत आणि श्रीलंकेच्या सांस्कृतिक कलावंतांसह वेस्ट इंडीजचा स्टील बँड, स्कॉटलंड आणि आयर्लंडच्या कलावंतांनी व स्थानिक माओरी हाका समूहानेदेखील कला सादर केली. हजारावर कलावंतांनी प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले.
न्यूझीलंडमध्ये उपस्थित असलेल्या सर्व संघांच्या कर्णधारांनी आपापल्या राष्ट्रध्वजांसह प्रेक्षकांपुढे हजेरी लावली. मोठ्या व्यासपीठावर विश्वचषक ठेवण्यात आला होता. पहिल्यांदा स्पर्धेत खेळणाऱ्या अफगाण संघाचा कर्णधार मोहंमद नबी याचे सर्वप्रथम आगमन झाले. पाठोपाठ बांगलादेशाचा कर्णधार मुशर्रफ मुर्तझा, इंग्लंडचा कर्णधार इयान मोर्गन, गतविजेत्या भारताचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, आयर्लंडचा कर्णधार विल्यम्स पोर्टरफिल्ड, पाकचा कर्णधार मिस्बाह उल् हक, स्कॉटलंडचा कर्णधार प्रेस्टन मौमसेन, यूएईचा मोहंमद तौकीर, विंडीजचा जेसन होल्डर आणि आॅस्ट्रेलियाचा मायकेल क्लार्क हे व्यासपीठावर आले. (वृत्तसंस्था)

Web Title: All the captain on the platform