आलिया, साक्षी आणि दीपा फोर्ब्सच्या यादीत

By Admin | Updated: April 13, 2017 19:04 IST2017-04-13T18:45:51+5:302017-04-13T19:04:12+5:30

फोर्ब्सने नुकतीच आशियातील 30 वर्षाच्या सेलिब्रिटींची यादी जाहीर केली आहे.

Alia, Sakshi and Deepa Forbes in the list | आलिया, साक्षी आणि दीपा फोर्ब्सच्या यादीत

आलिया, साक्षी आणि दीपा फोर्ब्सच्या यादीत

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 13 - फोर्ब्सने नुकतीच आशियातील 30 वर्षाच्या सेलिब्रिटींची यादी जाहीर केली आहे. चुलबुली, फनी, हॉट आणि बॉलिवूडची बबली गर्ल आलिया भट्टचा समावेश फोर्ब्सने नुकत्याच जारी केलेल्या सेलिब्रिटींच्या यादीत झाला आहे. फोर्ब्सने जारी केलेल्या आशियातील 30 वर्षाच्या सेलिब्रिटींच्या यादीत आलियाने स्थान मिळवले आहे. आलियाने स्टुडंट ऑफ द इयर या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेले. यानंतर तिने आतापर्यंत जवळपास 10 चित्रपटात वेगवेगळ्या भूमिका साकारत आपल्यातील अभिनय दाखवून दिला आहे. हायवे, डिअर जिंदगी, उडता पंजाब या चित्रपटातून आपल्या अभिनयाची चुनूक दाखवली आहे. शाहिद कपूर सोबत उडता पंजाब चित्रपटातील तिच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले. या चित्रपटातील अनोख्या भूमिकेसाठी तिला सर्वोकृष्ट अभिनेत्री म्हणून फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
आलिया भट्ट शिवाय खेळाचे मैदान गाजविणाऱ्या दीपा कर्मारकर आणि साक्षी मलिकला देखील फोर्ब्सच्या यादीत स्थान मिळाले आहे. रिओ ऑलिम्पिकमध्ये चौथे स्थान पटकावत जागतिक पातळीवर दीपाने सर्वांची वाहवा मिळवली होती. दीपा ऑलिम्पिकमध्ये ५२ वर्षांच्या कालावधीत सहभागी होणारी भारताची पहिली जिम्नॅस्ट ठरली होती. तर साक्षीने ५८ किलो फ्रीस्टाईलमध्ये गेल्या वर्षी रिओ ऑलिम्पिकमध्ये पदक पटकावले होते. भारतातर्फे ऑलिम्पिकमध्ये पदक पटकावणारी ती पहिली महिला मल्ल ठरली होती.

Web Title: Alia, Sakshi and Deepa Forbes in the list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.