अॅलेक्झांड्राला विश्वविजेतेपद निश्चित

By Admin | Updated: October 19, 2014 00:04 IST2014-10-19T00:04:08+5:302014-10-19T00:04:08+5:30

रशियाच्या अलेक्झांड्रा गो:याचकिनाने आज सफाईदार विजयाने जागतिक ज्युनिअर बुद्धिबळ स्पर्धेत अखेरची फेरी शिल्लक असतानाच विजेतेपदावर आपले नाव कोरूले आह़े

Alexandra is the world champion | अॅलेक्झांड्राला विश्वविजेतेपद निश्चित

अॅलेक्झांड्राला विश्वविजेतेपद निश्चित

शिवाजी गोरे - पुणो
रशियाच्या अलेक्झांड्रा गो:याचकिनाने आज सफाईदार विजयाने जागतिक ज्युनिअर बुद्धिबळ स्पर्धेत अखेरची फेरी शिल्लक असतानाच विजेतेपदावर आपले नाव कोरूले आह़े उद्या 13 व्या फेरीतला पराभव देखील तिचे विजेतेपद काढून घेऊ शकत नाही.
आज 12 व्या फेरीत पहिल्या पटावर खेळताना गो:याचकिनाला भारताच्या श्रीजा सेवाद्रीने कडवी झुंज दिली आणि इतक्या सुंदर प्रतिकाराबद्दल श्रीजादेखील कौतुकास पात्र ठरली आहे. निराश बचावाने सुरुवात झालेल्या या डावात गो:याचकिनाने डावाच्या मध्यभागात आपले वर्चस्व प्रस्थापित केले आणि डाव अंतिभावस्थेत नेला. भारतीय खेळाडू खास करून कुमार गटातील त्यांच्या आक्रमण शैलीसाठी प्रसिद्ध आहेत. मात्र, अंतिम अवस्था हा त्यांचा कमकुवत दुवा राहिला आहे. डावाच्या मध्यभागार्पयत छान खेळणा:या श्रीजाचा खेळ अंतिम अवस्थेत ढेपाळला आणि 52 व्या चालीला तिला डाव सोडणो भाग पडले. मात्र, श्रीजाने गो:याचकिनाला अभिनंदन करून, तिला विश्वविजेतेपदाचे अभिनंदन करणारी पहिली खेळाडू होण्याचा मान मिळविला.  विजेतेपदाची शर्यत संपलेली असली, तरी रौप्य आणि कांस्यपदकासाठी तीव्र चुरस बघायला मिळाली ती दुस:या आणि तिस:या पटावर. यात दुस:या पटावर पेरूच्या अॅन चुंपीताझने अझरबॅजानच्या इब्राहिमोव्हाला हरवून आपली गुणसंख्या 9 वर नेऊन दुस:या स्थानी ङोप घेतली. 
 तिस:या पटावर खादेमलशरियाने मेरी अरेबिझला हरविताना सर्वानाच आश्चर्याचा धक्का दिला. आता, खादेमलशरियाचे 8.5 गुण झाले आहेत आणि ती एकटीच तिस:या स्थानावर विराजमान आहे. भारताच्या पद्मिनीला पोलंडच्या इवानोव्ह विरुद्ध विजय आवश्यक होता. पण, निकराचे प्रयत्न करूनदेखील तिला बरोबरी स्वीकारावी लागली. अर्थात, पद्मिनीचेदेखील 8 गुण आहेत आणि पदक मिळविण्याच्या आशादेखील शिल्लक आहेत. उद्याच्या दिवसात काय काय घडामोडी होणार आहेत, याची उत्सुकता आजची रात्र लवकर संपवणार. 
 
तेराव्या फेरीअखेर मुलांच्या गटात 4 खेळाडू 9 गुणांसह संयुक्त आघाडीवर 
अग्रमानांकित सुपर ग्रँड मास्टर रशियाच्या फेडोसीव्हने आज आघाडीवर असणा:या चीनच्या थी वेईला पराभवाचा धक्का देऊन स्पर्धेतील चुरस कमालीची वाढवून ठेवली आहे. 12 व्या फेरीअखेर आता 4 खेळाडू 9 गुणांवर आहेत आणि यातले सर्वच खेळाडू विजेतेपद मिळविण्याच्या ताकदीचे आहेत. उद्या शेवटची फेरी विलक्षण रंगतदार होणार, यात काहीच शंका नाही. पहिल्या पटावर रशियाच्या अग्रमानांकित फेडोसीव्हने थी वेईचा 35 चालींत पराभव करताना ‘आपण अजून आहोत’ याची नोंद घ्यायला लावली.  दुस:या पटावर, थी वेईचा जोडीदार लू शांगले-ज्याने 1क् व्या फेरीत फेडोसीव्हला हरविण्याचा पराक्रम केला होता. त्याला पोलंडच्या कामिल द्रागून सोबत गुण वाटून घ्यावा लागला. खरं तर, जिंकण्याची संधी कामिललाच होती. परंतु, वेळेच्या संकटात सापडल्याने त्याने बरोबरी स्वीकारली.  लू शांगले जर आज जिंकला असता, तर त्याला इतर स्पर्धकांवर अध्र्या गुणाची आघाडी मिळविता आली असती, आणि स्पर्धेचे जेतेपद मिळविण्याची सुसंधीदेखील. खरा सनसनाटी निकाल नोंदवलाय, पोलंडच्या ग्रँडमास्टर डुडा क्रिस्तोव्हने. पेरूचा ग्रँडमास्टर जॉर्ज कोरीला पराभूत करून संयुक्त आघाडी मिळविली. अखेरच्या फेरीसाठी फेडोसीव्ह- थी वेई- लू शांगले आणि डुडा क्रिस्तोव्ह या चौघांमध्ये विजेतेपदाची शर्यत आहे. आजच्या फेरीत पांढरी मोहरे खेळलेले फेडोसीव्ह, लू शांगले आणि डुडा, तर काळी मोहरे घेऊन खेळलेला थी वेई उद्याच्या अखेरच्या फेरीत पांढरे मोहरे खेळेल.
 
भारताचे आशास्थान- विदितला आज विजय नोंदवता न आल्याने, पदक मिळविण्याच्या त्याच्या आशा जवळजवळ संपुष्टात आल्या आहेत. अर्थात, ‘जर-तर’ च्या निकालांमध्ये एक पुसटशी संधी विदितला मिळू शकते. 
 
4बाराव्या फेरीचे निकाल : पुरुष गट : व्लादिमीर फेदोसीव्ह (9 गुण, रशिया) वि. वि. वेड् यि (9, चीन); शांग्लेइ ल्यू (9, चीन) बरोबरी वि. कामिल ड्रॅगन (8.5, पोलंड); डुडा-यान-क्रिस्तोफ (9, पोलंड) वि. वि. जॉर्ज कोरी (8, पेरू); मुरली कार्तिकेयन (8, भारत) बरोबरी वि. विदीत गुजराथी (8, भारत); क्विंटेन डय़ुकरमन (8, हॉलंड) बरोबरी वि. अलेक्झांडर इंडिच (8, सर्बिया); आर्यन तारी (8, नॉव्रे) बरोबरी वि. ग्रिदोरी ओपरिन (8, रशिया); 
4मुली : अलेक्झांड्रा गोरियाच्किना (1क्.5 गुण, रशिया) वि. वि. श्रीजा शेषाद्री (8, भारत); सबिना इब्राहीमोवा (7.5, अझरबैजान) पराभूत वि. अॅन चुम्पिताझ (9, पेरू); मेरी अराबिद्ङो (7.5, जॉजिर्या) पराभूत वि. सारासादत (8.5, इराण); अॅना आयवानोव (8, पोलंड) बरोबरी वि. पद्मिनी रौत (8, भारत); मरीना ब्रुनेलो (8, इटली) वि. वि. दारिया पुस्तोव्होइतोवा (7.5, रशिया); मो झाड (7.5, चीन) बरोबरी वि. इव्हाना मारिया फुर्ताडो 
(7.5, भारत). 

 

Web Title: Alexandra is the world champion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.