अक्रम, शोएब मुंबईपासून ‘चार हात लांब’
By Admin | Updated: October 21, 2015 01:42 IST2015-10-21T01:42:50+5:302015-10-21T01:42:50+5:30
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय मालिकेला शिवसेनेचा असलेला विरोध लक्षात घेता भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात मुंबईत होणाऱ्या पाचव्या वन-डे

अक्रम, शोएब मुंबईपासून ‘चार हात लांब’
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय मालिकेला शिवसेनेचा असलेला विरोध लक्षात घेता भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात मुंबईत होणाऱ्या पाचव्या वन-डे सामन्यात वासिम अक्रम आणि शोएब अख्तर हे दोघे समालोचक असणार नाहीत.
शिवसेनेने वानखेडेवर सोमवारी केलेल्या राड्याचा या दोघांनी चांगलाच धसका घेतला असून, दोघांनी कॉमेंट्री पॅनेलवरून पाचव्या सामन्यासाठी माघार घेतली आहे.
अक्रम यांचा मॅनेजर अर्सलान हैदर यांनी याला दुजोरा दिला असून, दोघेही चौथ्या वन-डेनंतर पाकिस्तानात परत जाणार असल्याचे म्हटले आहे. वसीम अक्रम आणि शोएब अख्तर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाचव्या वन-डेसाठी सुरक्षेच्या कारणावरून कॉमेंट्री करणार नाहीत, असे हैदरने ट्विट केले आहे.