युथ कराटे चॅम्पियनशिपमध्ये अकोल्याला ३ सुवर्ण पदक

By Admin | Updated: August 31, 2014 22:51 IST2014-08-31T22:51:14+5:302014-08-31T22:51:14+5:30

अकोला : खामगाव येथे झालेल्या पहिल्या युथ कराटे चॅम्पियनशिपमध्ये अकोल्याच्या खेळाडूंनी ३ सुवर्ण व २ कांस्य पदक पटकाविली. गेनसुई कराटे क्लबच्या खेळाडूंनी स्पर्धेत अकोल्याचे प्रतिनिधित्व केले.

Akola won 3 gold medals in Youth karate championship | युथ कराटे चॅम्पियनशिपमध्ये अकोल्याला ३ सुवर्ण पदक

युथ कराटे चॅम्पियनशिपमध्ये अकोल्याला ३ सुवर्ण पदक

ोला : खामगाव येथे झालेल्या पहिल्या युथ कराटे चॅम्पियनशिपमध्ये अकोल्याच्या खेळाडूंनी ३ सुवर्ण व २ कांस्य पदक पटकाविली. गेनसुई कराटे क्लबच्या खेळाडूंनी स्पर्धेत अकोल्याचे प्रतिनिधित्व केले.
१२ वर्षाआतील गटात नेहा बुंदले, सुमंत टोंपे, १४ वर्षाआतील गटात युवराज गुळदे यांनी सुवर्ण पदक पटकाविले. हर्ष गवई, चैतन्य गवई यांनी कांस्य पदक मिळविले. १५ वर्ष वयोगटात वैष्णवी डांगटे, अक्षय लोणकर यांनी उत्कृष्ट खेळप्रदर्शन केले. प्रशिक्षक बबलू बहोरिया, नितेश बहोरिया, अमर तळोकार यांच्या मार्गदर्शनात खेळाडूंनी यश मिळविले. क्लबचे मार्गदर्शक शिवाजी चौहाण, राजेंद्र पातोडे, रंजित राठोड, सोनू अंबेरे, नीलेश तळोकार, संजय बोरकर, संतोष मोहोकार यांनी पदकप्राप्त खेळाडूंचे कौतुक केले. (क्रीडा प्रतिनिधी)
फोटोकॅप्शन : पदकप्राप्त खेळाडू मार्गदर्शकांसोबत. -०१सीटीसीएल२४
...

Web Title: Akola won 3 gold medals in Youth karate championship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.