अखिलेश दास यांचे निधन
By Admin | Updated: April 13, 2017 01:39 IST2017-04-13T01:39:56+5:302017-04-13T01:39:56+5:30
बॅडमिंटन असोसिएशन आॅफ इंडियाचे (बीएआय) अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री डॉ. अखिलेश दास यांचे बुधवारी हृदयविकाराने निधन झाले. ते ५६ वर्षांचे होते.

अखिलेश दास यांचे निधन
लखनौ : बॅडमिंटन असोसिएशन आॅफ इंडियाचे (बीएआय) अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री डॉ. अखिलेश दास यांचे बुधवारी हृदयविकाराने निधन झाले. ते ५६ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि मुलगी आहे.
दास यांना पहाटे हृदयविकाराचा जोरदार झटका आला. त्यांना नजीकच्या लॉरी इस्पितळात दाखल करण्यात आले असता पहाटे प्राणज्योत मालवल्याची माहिती काँग्रेसच्या सूत्रांनी दिली. दास यांच्या नेतृत्वात भारतीय बॅडमिंटनने जागतिक पातळीवर यशस्वी वाटचाल केली.