आकांक्षा व्होरा, हृतिका श्रीरामचा सुवर्णसह विक्रम
By Admin | Updated: February 7, 2015 01:42 IST2015-02-07T01:42:36+5:302015-02-07T01:42:36+5:30
४०० मीटर फ्रीस्टाइल आणि डायव्हिंगमध्ये नवीन विक्रमासह सुवर्णपदक जिंकून ३५ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पदकांचा धडाका कायम ठेवला.

आकांक्षा व्होरा, हृतिका श्रीरामचा सुवर्णसह विक्रम
राष्ट्रीय स्पर्धा : सौरभ, ज्योत्स्ना, सिमरनला रौप्य; महाराष्ट्र पदक तालिकेत दुसऱ्या क्रमांकावर
तिरुअनंतपूरम : महाराष्ट्राच्या आकांक्षा व्होरा व हृतिका श्रीरामने जलतरण प्रकारात अनुक्रमे ४०० मीटर फ्रीस्टाइल आणि डायव्हिंगमध्ये नवीन विक्रमासह सुवर्णपदक जिंकून ३५ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पदकांचा धडाका कायम ठेवला. दुसरीकडे पुरुषांच्या ४०० मीटर फ्रीस्टाइल प्रकारात सौरभ सांगवेकरला व ५० मीटर बॅक स्ट्रोक प्रकारात ज्योत्स्ना पानसरेला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. शुक्रवारी महाराष्ट्राच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करून पदक तालिकेत एकूण ७४ पदकांसह आपल्या संघाला दुसऱ्या क्रमांकावर ठेवून पोहोचविले. (वृत्तसंस्था)
च् महिलांच्या आकांक्षा व्होराने महिलांच्या ४०० मीटर फ्रीस्टाइल प्रकारात ४:३२.५० वेळेची नोंद करून नवीन विक्रमांसह सुवर्णपदकावर आपला हक्क प्रस्थापित केला. या प्रकारात कर्नाटकच्या मालविकाला रौप्य, तर मध्य प्रदेशच्या रिचा मिश्राला कांस्यपदक मिळाले.
च्डायव्हिंग प्रकारात महाराष्ट्राच्या हृतिका श्रीरामने १८७.३५ गुण संपादन करून नवीन विक्रमासह सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. याच प्रकारात महाराष्ट्राच्या सिमरनने १८७.२० गुण मिळवून रौप्यपदक जिंकले. पश्चिम बंगालच्या तनुका धाराला १४२.२५ गुणांसह कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
च्महिलांच्या ५० मीटर बॅक स्ट्रेक प्रकारात महाराष्ट्राच्या ज्योत्स्ना पानसरेने ३१.३६
सेकंदांची वेळ नोंदवून रौप्यपदक जिंकले. तिने जुन्या विक्रमाची बरोबरी केली. गुजरातच्या मन्ना पटेलने नवीन विक्रमासह (३०.६८) सुवर्णपदक जिंकले.
च्पुरुषांच्या ४०० मीटर फ्रीस्टाइल प्रकारात मात्र महाराष्ट्राच्या सौरभ सांगवेकरला ३:५९.७० सेकंदासह रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. या प्रकारात केरळच्या साजन प्रकाशने (३:५७.१६) सुवर्णपदक जिंकले. केरळच्या आनंदने कांस्यपदक जिंकले.
चैनसिंगला पराभूत करून स्वप्निलने जिंकले रौप्य
महाराष्ट्राच्या स्वप्निल कुसाळेने आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदकविजेत्या चैनसिंगला ५० मीटर रायफल थ्री पोझीशन प्रकारात पराभूत करून रौप्यपदक जिंकून खळबळ उडवून दिली.
नाशिक येथील क्रीडा प्रबोधिनीत प्रशिक्षण घेत असलेल्या स्वप्निलने ४५५.६ गुणांचे लक्ष साधले. सेनादलाच्या सत्येंद्ररसिंगने ४५६ गुण मिळवून सुवर्ण तर चैनसिंगने ४३४.९ गुण मिळवून कांस्यपदक जिंकले.
मोठ्या स्पर्धांमध्ये प्रत्येक खेळाडूवर थोडे तरी दडपण असते. या स्पर्धेमध्ये भारतातील दिग्गज नेमबाज सहभागी झाले आहेत. चैनसिंगसारखा प्रतिस्पर्धी समोर असताना मानसिक तणाव असणार पण आजची माझी खेळी उत्कृष्ट झाली.
- स्वप्निल कुसाळे