अजमल निवृत्तीच्या विचारात
By Admin | Updated: September 15, 2015 18:48 IST2015-09-15T18:48:54+5:302015-09-15T18:48:54+5:30

अजमल निवृत्तीच्या विचारात
>कराची: घरेलू टी-20 लीगमध्ये खराब कामगिरीनंतर पाकिस्तानचा अनुभवी स्पिनर सईद अजमल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा विचार करीत आह़े एका सूत्राने सांगितले की, सईद आपल्या खराब फॉर्मात आणि नव्या गोलंदाजी अँक्शनमध्ये लय प्राप्त करू न शकल्याने निराश आह़े हेच कारण आहे की त्याने रावळपिंडीमध्ये फैसलाबादचा अखेरचा सामनादेखील खेळलेला नाही़ चार सामन्यामध्ये 124 धावा देताना केवळ दोन बळी घेऊ शकलेल्या 37 वर्षीय अजमल नव्या अँक्शनसह प्रभावी प्रदर्शन करू शकले नाही़