अजिंक्य रहाणेचे अर्धशतक, भारत ६ बाद १७५

By Admin | Updated: December 3, 2015 15:30 IST2015-12-03T11:07:17+5:302015-12-03T15:30:17+5:30

दक्षिण आफ्रिके विरुध्दच्या चौथ्या कसोटी सामन्यात अजिंक्य रहाणेने अर्धशतक झळकवले आह.

Ajinkya Rahane's half-century, India 175 for six | अजिंक्य रहाणेचे अर्धशतक, भारत ६ बाद १७५

अजिंक्य रहाणेचे अर्धशतक, भारत ६ बाद १७५

ऑनलाइन लोकमत

 नवी दिल्ली, दि. ३ - दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजीसमोर भारताचे आघाडीचे फलंदाज स्वस्तात बाद होत असताना, मुंबईकर अजिंक्य रहाणेने मात्र दुस-या टोकाकडून शांतता, संयमाने फलंदाजी करत अर्धशतक झळकवले आहे. रहाणेचे हे भारतातील पहिले अर्धशतक आहे. रहाणे (५५), रविंद्र जाडेजा (१३) ही जोडी मैदानावर असून, भारताने १७५ धावांचा टप्पा पार केला आहे. 

चौथी कसोटी जिंकून मालिकेत ३-० असा मोठा विजय मिळवण्याचे स्वप्न पाहणा-या भारताचा डाव अडचणीत सापडला आहे. भारताचे सहा गडी तंबूत परतले आहेत.  संघाचे आघाडीचे सहा फलंदाज बाद झाल्याने भारताला चांगलाच धक्का बसला आहे. 

विजय (१२), धवन (३३) ,पुजारा (१४) , कर्णधार कोहली (४४) आणि रोहित शर्मा (१२) हे फलंदाज स्वस्तात बाद होऊन तंबूत परतले. सध्या अजिंक्य रहाणे (३१) आणि वृध्दीमान सहाची (१) जोडी मैदानावर आहे. पीएटने चार तर, अॅबॉटने एक गडी बाद केला. 
आतापर्यंत भारतातर्फे कोहलीने सर्वाधिक (४४) धावा केल्या आहेत. चौथ्या विकेटसाठी कोहली आणि रहाणेमध्ये झालेली ७० धावांची भागीदारी आतापर्यंतची मोठी भागीदारी आहे. 

उपहारापर्यंत अवघी १ विकेट गमवून सुस्थितीत असलेला भारताचा डाव नंतर अडचणीत सापडला. उपहारानंतर खेळ सुरु होताच भारताला लागोपाठ दोन धक्के बसले. डेन पीएटने शिखर धवनला (३३) तर अॅबोटने चेतेश्वर पूजाराचा (१४) त्रिफळा उडवला. त्या आधी डेन पीएटने धवनला पायचीत केले. त्याआधी त्याने विजयला (१२) धावांवर आमलाकरवी झेलबाद केले.  

भारताला मालिकेत २-० अशी आघाडी मिळाली असल्याने हा सामना जिंकून ३-० अशा मोठ्या विजयासोबतच आयसीसी कसोटी क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर झेप घेण्याचा भारताचा इरादा आहे.

तत्पूर्वी सामान सुरू होण्यापूर्वी फिरोजशहा कोटला मैदानावर नुकताच निवृत्त झालेला भारताचा धडाकेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवागचा बीसीसीआयतर्फे सत्कार करण्यात आला.

Web Title: Ajinkya Rahane's half-century, India 175 for six

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.