शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला; संजय शिरसाट संतापले, म्हणाले, “खाते बंद केले तरी चालेल”
2
खात्यात काय सुरु माहिती नाही, निधी वळल्यावर संतापाला काय अर्थ? वडेट्टीवारांचा शिरसाटांवर निशाणा
3
नाशिकमध्ये आणखी एक हत्या! आरोपीने हत्या केल्यानंतर स्वतःच नेले जिल्हा रुग्णालयात, स्वतःहून गेला पोलीस ठाण्यात
4
“अमित शाह महाराष्ट्रात ३ पक्ष चालवतात, अजितदादा-एकनाथ शिंदे कधीही CM होणार नाहीत”: संजय राऊत
5
हिंदी चित्रपटात का दिसत नाहीत भरत जाधव? सांगितलं महत्त्वाचं कारण, म्हणाले- "एकदा मला नोकराची भूमिका..."
6
भारताच्या भीतीनं कराची स्टॉक एक्सचेंजमध्ये भूकंप, असा पडला की आता बाहेर येणंही झालं कठीण
7
Rashid Khan: असा झेल कधीच पाहिला नसेल, गुजरात- हैदराबाद सामन्यात राशीद खानची जबरदस्त फिल्डिंग
8
"दोन पेग मारल्यानंतर सलमान खानने माझ्याशी..."; मिका सिंगने सांगितली भाईजानची कधीही न ऐकलेली गोष्ट
9
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
10
शिक्षिकेचं १३ वर्षाच्या विद्यार्थ्यासोबतच जुळलं सूत, पळूनही गेली; मानसी म्हणाली, 'माझ्या गर्भात त्याचं बाळ'
11
कर्ज नको म्हणून दिव्यांगाचा काढला विमा; हत्या करुन हडपले लाखो रुपये, 'असा' झाला पर्दाफाश
12
काव्या मारनपेक्षाही अनेक पटींनी श्रीमंत आहे राम चरणची सासू; एकट्या सांभाळतात ७७ हजार कोटींचा व्यवसाय
13
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
14
नारळ पाण्यामुळे शुगर लेव्हल वाढते का, किती असते नॅचरल शुगर, शरीरावर काय होतो परिणाम?
15
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
16
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
17
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
18
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
19
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
20
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?

अजयने टाळला पुण्याचा पराजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2016 00:49 IST

शेवटपर्यंत रंगतदार ठरलेल्या पुणेरी पलटण व पाटना पायरेट्स यांच्यातील रोमहर्षक सामना ३०-३० असा बरोबरीत सुटला. शेवटच्या क्षणी अजय ठाकूरने २ गडी बाद केल्याने पुण्याचा पराभव टळला.

- विशाल शिर्के,  पुणेशेवटपर्यंत रंगतदार ठरलेल्या पुणेरी पलटण व पाटना पायरेट्स यांच्यातील रोमहर्षक सामना ३०-३० असा बरोबरीत सुटला. शेवटच्या क्षणी अजय ठाकूरने २ गडी बाद केल्याने पुण्याचा पराभव टळला. पाटनाचा प्रदीप नरवाल याने अफलातून चढाई करीत प्रेक्षकांची मने जिंकली. पुण्याच्या मनजित चिल्लर व जसमिरसिंग गुलिआ यांची खेळी भाव खाऊन गेली. म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडासंकुलातील बॅडमिंटन हॉलमध्ये हा सामना झाला. पाटना पायरेट्सने सुरुवातीपासून आक्रमक भूमिका घेत पुणेरी पलटणवर चांगलाच दबाव निर्माण केला. पाटना पायरेट्सच्या प्रदीप नरवालच्या बिनतोड चढाया, त्याला डी. सुरेश कुमार याच्या अष्टपैलू खेळीची मिळालेली साथ यांमुळे पाटना संघाने दहाव्या मिनिटालाच पुण्याचा संपूर्ण संघ बाद करीत लोण चढविला. त्या वेळी पुणे ४-१२ असे मागे होते. पुण्याचे मनजित चिल्लर व अजय ठाकूर यांनी केलेली उत्कृष्ट चढाई व त्याला जसमिरसिंग गुलिआ याच्या जबरदस्त पकडीची साथ मिळाल्याने पुणे संघाने १८व्या मिनिटाला पायरेट्सचा संघ बाद करीत लोण चढविला. तेव्हा पुणे संघाने १३-१६ अशी पिछाडी कमी केली. पूर्वार्ध संपण्यास काही सेकंद शिल्लक असताना पाटनाच्या प्रदीप नरवालने ३ गडी बाद करीत सुपर रेड मारली. त्यामुळे पाटनाने २९-१६ अशी आघाडी घेतली. उत्तरार्धात दोन्ही संघांनी आक्रमण व प्रति अक्रमण करीत सामन्यातील चुरस कायम ठेवली. मात्र अगदी ३५व्या मिनिटापर्यंत पाटना संघाकडे २७-२६ अशी निसटती अघाडी होती. प्रदीपने पुन्हा दोन गडी बाद करीत २९-२७ अशी अघाडी घेतली. त्यानंतर शेवटची दोन मिनिटे शिल्लक असताना पुण्याने २८-३० अशी पिछाडी कमी केली. शेवटच्या मिनिटाला पुण्याच्या अजय ठाकूरने चढाई केला. त्या वेळी पाटनाच्या खेळाडूंनी त्याला मैदानाबाहेर ढकलण्याचा प्रयत्न केला. मात्र, पंचांनी दोन्ही संघांतील खेळाडूंना बाद ठरविले. पुणे संघाने तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली. त्यात अजयच्या पारड्यात २ गुण पडले. त्यामुळे पुणे संघाने ३०-३० अशी बरोबरी साधून सामना अनिर्णीत ठेवण्यात यश मिळविले. दोन्ही संघांना एक-एक गुण देण्यात आला.