आस्था स्पोर्टस अकादमीचे तायक्वांडो स्पर्धेत यश

By Admin | Updated: September 27, 2014 23:18 IST2014-09-27T23:18:16+5:302014-09-27T23:18:16+5:30

अकोला : यवतमाळ येथे झालेल्या अमरावती विभागीय शालेय तायक्वांडो स्पर्धेत कुणाल शेंडे फाऊडेशन अंतर्गत असलेल्या आस्था स्पोर्टस् अकादमीच्या खेळाडूंनी विजयी परंपरा कायम राखत राज्य स्तर स्पर्धेसाठी निवड निश्चित केली.

Aishwarya Sports Academy's Taekwondo Championship success | आस्था स्पोर्टस अकादमीचे तायक्वांडो स्पर्धेत यश

आस्था स्पोर्टस अकादमीचे तायक्वांडो स्पर्धेत यश

ोला : यवतमाळ येथे झालेल्या अमरावती विभागीय शालेय तायक्वांडो स्पर्धेत कुणाल शेंडे फाऊडेशन अंतर्गत असलेल्या आस्था स्पोर्टस् अकादमीच्या खेळाडूंनी विजयी परंपरा कायम राखत राज्य स्तर स्पर्धेसाठी निवड निश्चित केली.
यामध्ये १४ वर्षाआतील गटात रोहिणी फड, शुशोभन काशीद, योगीराज इंगळे, तेजस बचे, अमर कांबळे, विशाल वाघमारे, १७ वर्षाआतील गटात शेख वाजीद शेख रशीद, शुभम घायवट, ऋषिकेश सरनाईक, भूषण बैस, सुदर्शन जयस्वाल, मुलींमध्ये पूजा काशीद, १९ वर्षाआतील गटात दीपाली सिरसाट, मेघा बोळे, मुक्त सावरकर, कल्याणी आगळे, सुरज गुंजकर यांनी विविध वजन गटात प्रथम स्थान प्राप्त केले. संस्कृती नागे, पुनम काशीद, आदिती रायबोले, अजिंक्य तायडे, अजय राजपूत यांनी द्वितीय स्थान मिळविले. प्रशिक्षक राहुल गजभिये, प्रशांत गजभिये, मार्गदर्शक श्रीराम गावंडे, अकादमीच्या अध्यक्ष माजी महापौर सुमनताई गावंडे, विक्रम गावंडे यांचे मार्गदर्शन खेळाडूंना लाभले.(क्रीडा प्रतिनिधी)
...

Web Title: Aishwarya Sports Academy's Taekwondo Championship success

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.