सुपरलीगच्या ओपनिंग सेरेमनीमध्ये ऐश्वर्या, आलिया थिरकणार रेहमानच्या संगीतावर
By Admin | Updated: October 3, 2015 09:54 IST2015-10-03T09:54:59+5:302015-10-03T09:54:59+5:30
इंडियन सुपर लीग या फुटबॉल स्पर्धेचं उद्घाटन आज संध्याकाळी होणार असून ऐश्वर्या राय, आलिया भट आणि ए. आर. रेहमान ओपनिंग सेरेमनीमध्ये परफॉर्म करण्यासाठी सज्ज झाले आहेत

सुपरलीगच्या ओपनिंग सेरेमनीमध्ये ऐश्वर्या, आलिया थिरकणार रेहमानच्या संगीतावर
>ऑनलाइन लोकमत
चेन्नई, दि. ३ - इंडियन सुपर लीग या फुटबॉल स्पर्धेचं उद्घाटन आज संध्याकाळी होणार असून ऐश्वर्या राय, आलिया भट आणि ए. आर. रेहमान ओपनिंग सेरेमनीमध्ये परफॉर्म करण्यासाठी सज्ज झाले आहेत. हे सुपर लीगचं दुसरं वर्ष असून ७९ दिवस ही स्पर्धा रंगणार आहे. चेन्नईतील जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये पहिला सामना कोलकाता व चेन्नई यांच्यात रंगणार आहे.
ओपनिंग सेरेमनी अत्यंत भव्यदिव्य स्वरुपात करण्यात येणार असून जवळपास ५०० डान्सर्ससह एकूण २००० जण यात भाग घेणार आहेत.
विविध गाण्यांसह ए. आर. रेहमान राष्ट्रगीत सादर करणार आहे. विविधतेने नटलेल्या या देशात राष्ट्रगीतामुळे आपण एका देशाचे नागरीक आहोत ही भावना जागृत होते असे मत रेहमानने व्यक्त केले आहे.
पहिल्या वर्षी झालेल्या सुपर लीगचे सामने जवळपास ४३ कोटी लोकांनी टीव्हीवर पाहिले तर १५ लाख प्रेक्षकांनी स्टेडियममध्ये सामन्यांचा आनंद लुटला. सगळ्यात जास्त बघितलेली फूटबॉल लीग म्हणून चौथ्या स्थानावर गेल्या वर्षीची सुपर लीग होती, यावरून भारतातही फुटबॉलची पाळंमुळं रुजत असल्याचं दिसून येत आहे. संध्याकाळी सहा वाजल्यापासून स्टारच्या स्पोर्ट्स चॅनेल्सवर सुपरलीगचं थेट प्रक्षेपण होणार आहे.