विमानप्रवासाची हौस भागली

By Admin | Updated: March 30, 2016 02:46 IST2016-03-30T02:46:47+5:302016-03-30T02:46:47+5:30

सराव सामने व विविध ठिकाणी होणाऱ्या सामन्यांसाठी न्यूझीलंडला बरीच फिरस्ती करावी लागली. त्यावर आमच्या खेळाडूंनी भारतात हॉटेलिंग व विमानोड्डाणांचा पुरेपूर आनंद घेतला

The airplane was aroused | विमानप्रवासाची हौस भागली

विमानप्रवासाची हौस भागली

नवी दिल्ली : सराव सामने व विविध ठिकाणी होणाऱ्या सामन्यांसाठी न्यूझीलंडला बरीच फिरस्ती करावी लागली. त्यावर आमच्या खेळाडूंनी भारतात हॉटेलिंग व विमानोड्डाणांचा पुरेपूर आनंद घेतला असल्याची मिश्कील टिप्पणी न्यूझीलंडचा कर्णधार विल्यमसन याने केली आहे.
न्यूझीलंडने १० व १२ मार्च रोजी मुंबईत दोन सराव सामने खेळले. त्यानंतर १५ मार्चला नागपूरमध्ये भारताविरुद्ध आपल्या अभियानास सुरुवात केली. तर, १८ मार्च रोजी धरमशाला येथे, तर २२ मार्च रोजी मोहालीत पाकिस्तान विरुद्ध सामना खेळला. त्यानंतर २६ मार्च रोजी बांगलादेश संघाशी खेळण्यासाठी कोलकाता येथे आला होता. आता पुन्हा दिल्ली येथे संघ आला आहे.
विल्यम्सन म्हणाला, भारताचे विविध भाग पाहता आले. हा अनुभव शानदार होता. त्यानिमित्ताने खेळाडूंनीदेखील विविध प्रकारच्या हॉटेलमध्ये वास्तव्याचा व विमानोड्डाणांचा पुरेपूर आनंद घेतला.

Web Title: The airplane was aroused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.