वर्ल्डकपमधून इंग्लंड बाद, बांग्लादेशने केला पराभव

By Admin | Updated: March 9, 2015 17:34 IST2015-03-09T17:07:20+5:302015-03-09T17:34:16+5:30

वर्ल्डकपमध्ये रोमहर्षक सामन्यात बांग्लादेशने इंग्लंडचा १५ धावांनी पराभव करत क्वार्टर फायनलमध्ये धडक दिली.

After the World Cup, after England, defeated Bangladesh | वर्ल्डकपमधून इंग्लंड बाद, बांग्लादेशने केला पराभव

वर्ल्डकपमधून इंग्लंड बाद, बांग्लादेशने केला पराभव

ऑनलाइन लोकमत

अॅडिलेड, दि. ९ - वर्ल्डकपमध्ये रोमहर्षक सामन्यात बांग्लादेशने इंग्लंडचा १५ धावांनी पराभव करत क्वार्टर फायनलमध्ये धडक दिली. या पराभवामुळे क्रिकेटचा जन्मदाता म्हणून ओळखल्या जाणा-या इंग्लंडचे वर्ल्डकपमधील आव्हान संपुष्टात आले आहे.  

सोमवारी वर्ल्डकपमध्ये इंग्लंड विरुद्ध बांग्लादेश हे संघ आमने सामने होते. विश्वचषकातील आव्हान कायम राखण्यासाठी दोन्ही संघाना हा सामना जिंकणे अत्यंत महत्त्वाचे होते. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जेम्स अँडरसनने पहिले २ बळी टिपून बांग्लादेशच्या फलंदाजीला सुरुंग लावला. अवघ्या शंभर धावांच्या आत बांग्लादेशने ४ गडी गमावले होते. मात्र त्यानंतर  महमदुल्लाहचे दमदार शतक (१०३) आणि मुशफिकर रहीमच्या ८९ धावांनी बांग्लादेशचा डाव सावरला. बांग्लादेशने ५० षटकांत ७ गडी गमावत २७५ धावा केल्या. 

बांग्लादेशने दिलेले आव्हान गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या इंग्लंडच्या फलंदाजांना फारशी चमक दाखवता आली नाही. इयान बेलच्या ६३ धावा आणि जॉस बटलरच्या ६५ धावावगळता उर्वरित सर्व फलंदाजांनी बांग्लादेशच्या गोलंदाजांसमोर शरणागती पत्कारली. शेवटच्या तीन षटकांमध्ये इंग्लंडला विजयासाठी ३१ धावांची आवश्यकता होता. तस्किन अहमदने टाकलेल्या षटकांत स्टुअर्ट ब्रॉड आणि क्रिस वोग्स या दोघांनी १५ धावा काढल्या. या षटकामुळे इंग्लंडच्या आशा जीवंत झाल्या व इंग्लंडला १२ चेंडूंमध्ये १६ धावांची आवश्यकता होती. रुबेल हुसैनने ४९ व्या षटकांत स्टुअर्ट ब्रॉड (९ धावा) आणि जेम्स अँडरसनला त्रिफळाचीत करत बांग्लादेशला विजय मिळवून दिला. इंग्लंडचा डाव २६० धावांवरच आटोपला. इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू क्रिस वोग्स ४२ धावांवर नाबाद राहिला. बांग्लादेशने दुस-यांदा वर्ल्डकपमध्ये इंग्लंडचा पराभव केला असून यापूर्वी २०११ च्या वर्ल्डकपमध्येही बांग्लादेशने इंग्लंडचा २ विकेट्सनी पराभव केला होता. सामन्यात शतक ठोकणारा महमदुल्लाहाला सामनीवाराचा पुरस्कार देण्यात आला.  

 

Web Title: After the World Cup, after England, defeated Bangladesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.