विजयानंतर रोहितने पत्नी रितिकाला ठरवले "लकीचार्म"

By Admin | Updated: May 22, 2017 09:50 IST2017-05-22T09:35:23+5:302017-05-22T09:50:50+5:30

आयपीएलच्या रंगतदार फायनलमध्ये मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी अक्षरक्ष: विजय खेचून आणल्यानंतर कर्णधार रोहित शर्माला झालेला आनंद पाहण्यासारखा होता.

After winning, Rohit decided to give his wife Rituika "Lucky Chem" | विजयानंतर रोहितने पत्नी रितिकाला ठरवले "लकीचार्म"

विजयानंतर रोहितने पत्नी रितिकाला ठरवले "लकीचार्म"

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. 22 - आयपीएलच्या रंगतदार फायनलमध्ये मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी अक्षरक्ष: विजय खेचून आणल्यानंतर कर्णधार रोहित शर्माला झालेला आनंद पाहण्यासारखा होता. रोहितला विजयानंतर काय करु आणि काय नको असे झाले होते. पुण्यावर फक्त 1 रन्सने विजय मिळवून तिस-यांदा आयपीएलचा चषक उंचावणा-या रोहितने सामन्यानंतर पत्नी रितिका सजदेह सोबतचा एक फोटो त्याच्या इन्स्टाग्राम अकांऊटवर शेअर केला आहे. 
 
या फोटोसोबत एक ओळ लिहीताना त्याने पत्नीला लकी चार्म म्हटले आहे. आयुष्यात आपल्या मनासारख्या गोष्टी घडत जातात तेव्हा जवळची व्यक्ती सोबत असल्यानेच आपले भाग्य फळफळलेय अशी आपली धारणा असते. तेव्हा त्या व्यक्तीला आपण लकीचार्म म्हणतो. ही लकीचार्म असलेली व्यक्ती कोणीही असू शकते. 
 
रितिका मुंबई इंडियन्सच्या बहुतांश सामन्यांना स्टेडियममध्ये उपस्थित होती. रोहितला साथ देण्यासाठी तिने संघासोबतच प्रवास केला. या विजयासह मुंबई इंडियन्स आयपीएलमध्ये सर्वाधिकवेळा विजेतेपद मिळवणार संघ ठरला आहे. आयपीएलच्या दहा सीझनमध्ये मुंबईने तीन वेळा तर, कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्जला दोनदा विजेतेपद मिळवता आले आहे. मुंबईच्या 130 धावांच्या माफक लक्ष्याच पाठलाग करताना पुण्याला निर्धारित 20 षटकात सहाबाद फक्त 128 धावा करता आल्या. 
 
 

Web Title: After winning, Rohit decided to give his wife Rituika "Lucky Chem"