ब-याच वर्षांच्या कालावधीनंतर 83 वर्षीय आजी खेळतेय पुन्हा टेनिस

By Admin | Updated: January 10, 2017 17:32 IST2017-01-10T16:06:57+5:302017-01-10T17:32:17+5:30

अर्जेंटिनामधील 83 वर्षीय आजी ब-याच वर्षांच्या कालावधीनंतर पुन्हा टेनिस खेळण्यासाठी कोर्टवर उतरली आहे. त्यामुळे तिचे ब-याच वर्षांपासून अधुरे राहिलेले टेनिस खेळण्याचे स्वप्न पुर्ण होत आहे.

After a very long time, 83-year-old grandmother plays tennis again | ब-याच वर्षांच्या कालावधीनंतर 83 वर्षीय आजी खेळतेय पुन्हा टेनिस

ब-याच वर्षांच्या कालावधीनंतर 83 वर्षीय आजी खेळतेय पुन्हा टेनिस

>ऑनलाइन लोकमत
ब्यूएनोस एअरस्, दि, 10 - अर्जेंटिनामधील 83 वर्षीय आजी ब-याच वर्षांच्या कालावधीनंतर पुन्हा एकदा टेनिस खेळण्यासाठी कोर्टवर उतरली आहे. त्यामुळे तिचे ब-याच वर्षांपासूनचे अधुरे राहिलेले टेनिस खेळण्याचे स्वप्न पूर्ण होत आहे. 
अॅना ओबॅरिओ असे या आजीचे नाव असून तिच्या नव-यामुळे 1949 सालापासून ती टेनिस खेळण्यापासून लांब राहिली. त्यानंतर पुढील अनेक वर्षे  तिने आपल्या मुलाचं संगोपन करण्यात घालवली. मात्र, आता कित्येक वर्षांनंतर तिच्या कुटुंबीयामुळेच पुन्हा ती टेनिस खेळण्यासाठी कोर्टवर उतरली आहे. 
ब्यूएनोस एअरस् येथील हर्लिंगम स्पोर्ट क्लबमध्ये झालेल्या अर्जेंटिना सिनिअर मास्टर्स चॅम्पियन स्पर्धेत विजय मिळविल्यानंतर आजी म्हणाली की, मला स्पर्धा खेळायला आवडतात. तसेच मला त्या जिंकायलासुद्धा तितक्याच आवडतात. 
लहान वयात असताना आजीने टेनिसच्या युथ चॅम्पियनमध्ये भाग घेत अनेक सामने खेळले. त्यानंतर वयाच्या 18 व्या वर्षी लग्न झाल्यानंतर तिला अनेक टेनिस सामने खेळण्याच्या संधीसुद्धा उपलब्ध झाल्या होत्या. मात्र तिच्या पतीला मिश्र दुहेरी सामन्यात तिने खेळलेले आवडत नव्हते. त्यामुळे त्याने तिला टेनिस खेळण्यास सक्त मनाई केली होती.
 

Web Title: After a very long time, 83-year-old grandmother plays tennis again