शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
3
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
4
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
5
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
6
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
7
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
8
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
9
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
10
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
11
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
12
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
13
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
14
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
15
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
16
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
17
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
18
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
19
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार

Neeraj Chpopra:ऐतिहासिक विजयानंतर नीरज चोप्राच्या आईने केला जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2022 11:59 IST

भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने आपला विजयरथ कायम ठेवून आणखी एक पदक मिळवले आहे.

नवी दिल्ली : भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने आपला विजयरथ कायम ठेवून आणखी एक पदक मिळवले आहे. नीरज चोप्राने वर्ल्ड ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये (World Atheletics Championships) रौप्य पदक मिळवल्याने देशभर आनंदाचे वातावरण आहे. लक्षणीय बाब म्हणजे त्याने चॅम्पियनशिपमध्ये पदक मिळवून भारताचा १९ वर्षांचा दुष्काळ मिटवला आहे. २४ वर्षीय नीरजने केलेल्या कारनाम्यामुळे त्याच्या कुटुंबियांसह देशभरातील प्रत्येक नागरिकाला आनंद झाला आहे. त्याच्या गावातील लोकांनी देखील डान्स करून आनंद व्यक्त केला आहे, तो हरियाणामधील पानीपत येथील रहिवासी आहे.

नीरजच्या आईने केला डान्स

दरम्यान, गावकऱ्यांसोबत नीरजच्या घरच्यांनी देखील डान्स केला आणि आनंद साजरा केला आहे. सध्या याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये नीरजची आई सरोज देवी यादेखील डान्स करताना दिसत आहेत. नीरजच्या आईने सांगितले, "मला पूर्ण आशा होती की माझा मुलगा नक्की पदक मिळवेल. त्याने पूर्ण तयारी केली होती. नीरजने आपल्या भारत देशाचे नाव रोशन केल्याचा मला आनंद आहे."

नीरजच्या गावातील लोकांनी त्याच्या घरी गर्दी केली असून त्याच्या कुटुंबियांवर अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत. नीरजचे वडील सतीश कुमार यांनी एका वृत्तवाहिनीशा बोलताना म्हटले, "नीरजने एका चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक जिंकले आहे. मला याचा खूप आनंद आहे. हा एक मोठा विजय आहे, कारण चॅम्पियनशिपमध्ये देशाला आतापर्यंत केवळ एक पदक मिळाले होते. आता त्यात आणखी एकाची भर पडली आहे. तो पुढील स्पर्धेत देखील चांगली कामगिरी करेल अशी आम्हाला आशा आहे." विशेष म्हणजे नीरज या महिन्याच्या २८ तारखेपासून इंग्लंडमधील बर्मिंहगॅम येथे होणाऱ्या कॉमनवेल्थ गेम्ससाठी जाणार आहे. 

१९ वर्षांनंतर भारताला मिळाले पदकवर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारताला तब्बल १९ वर्षांपूर्वी २००३ मध्ये पहिले पदक मिळाले होते. २००३ मध्ये लॉन्ग जम्पमध्ये मिळालेल्या पदकानंतर भारत आपल्या दुसऱ्या पदकाच्या प्रतीक्षेत होता. मात्र आज नीरज चोप्राने तमाम भारतीयांचे स्पप्न पूर्ण केले आहे. २००३ मध्ये भारताची स्टार अॅथलीट अंजू बॉबी जॉर्जने पहिले पदक जिंकले होते, तिने महिलांच्या लांब उडीत कास्यंपदक पटकावले होते. 

नीरजची आतापर्यंतची 'सुवर्ण' कामगिरी जागतिक कनिष्ठ अजिंक्यपद स्पर्धा - सुवर्णपदकआशियाई स्पर्धा २०१८ - सुवर्णपदक राष्ट्रकुल स्पर्धा - सुवर्णपदकटोकियो ऑलिम्पिक २०२० - सुवर्णपदकजागतिक ॲथलेटिक्स स्पर्धा २०२२ - रौप्यपदक 

 

टॅग्स :Neeraj Chopraनीरज चोप्राOlympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2021IndiaभारतSocial Mediaसोशल मीडिया