साई प्रणीत पात्रता फेरीतच बाद
By Admin | Updated: October 21, 2015 01:35 IST2015-10-21T01:35:53+5:302015-10-21T01:35:53+5:30
बी साई प्रणीत याचे आव्हान पात्रता फेरीतच संपुष्टात आल्याने फ्रेंच ओपन सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेत भारताची सुरुवात निराशाजनक झाली.

साई प्रणीत पात्रता फेरीतच बाद
पॅरिस : बी साई प्रणीत याचे आव्हान पात्रता फेरीतच संपुष्टात आल्याने फ्रेंच ओपन सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेत भारताची सुरुवात निराशाजनक झाली.
विशेष म्हणजे, पुरुष एकेरी गटात प्रणीतला द्वितीय मानांकन लाभले होते. चायनीज - तैपईच्या बिगरमानांकित वांग झू वेईने आक्रमक खेळ करताना, केवळ ३६ मिनिटांमध्ये प्रणीतचे आव्हान २१-१५, २१-१५ असे संपुष्टात आणले. जागतिक क्रमवारीत वांग ४९ व्या स्थानी असून, प्रणीत ३६व्या स्थानी आहे. या दोन खेळाडूंमध्ये पहिल्यांदाच लढत झाली आणि यात वांगने सहज बाजी मारत सर्वांचे लक्ष वेधले.
दरम्यान, स्पर्धेच्या मुख्य लढतींना बुधवारपासून सुरुवात होणार असून, महिला गटात अग्रमानांकित भारताच्या सायना नेहवालवर सर्वांचे लक्ष असेल. कॅनडाच्या मिशेल लीचे सायनासमोर असेल. डेन्मार्क ओपन स्पर्धेतील उपविजेती पी.व्ही. सिंधूसमोर सलामीला चीनच्या शिजियानचे आव्हान असेल.
पुरुष एकेरी गटात पाचव्या मानांकित के. श्रीकांत, आठव्या मानांकित पारुपल्ली कश्यप आणि एच.एस. प्रणय यांच्यावर भारताच्या विजेतेपदाची मदार असेल.