पुस्तक वाचल्यानंतर वाटल्यास मत व्यक्त करेन
By Admin | Updated: November 5, 2014 00:32 IST2014-11-05T00:32:58+5:302014-11-05T00:32:58+5:30
सचिन तेंडुलकर आणि ग्रेग चॅपेल यांच्यात काय बोलणे झाले, हे मला माहीत नाही

पुस्तक वाचल्यानंतर वाटल्यास मत व्यक्त करेन
मुंबई : सचिन तेंडुलकर आणि ग्रेग चॅपेल यांच्यात काय बोलणे झाले,
हे मला माहीत नाही. त्यांची ही खासगी चर्चा होती आणि त्यावर मी काही बोलणे योग्य ठरणार नाही. पुस्तक न वाचताच त्याच्यावर प्रतिक्रिया देणे चुकीचे ठरेल आणि ते वाचल्यानंतर मला वाटले, तरच त्यावर बोलेन, असे स्पष्ट मत भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविड याने मंगळवारी व्यक्त केले.
‘प्लेइंग इट माय वे’ या आत्मचरित्रात सचिन तेंडुलकरने २००७च्या वर्ल्डकपपूर्वी प्रशिक्षक ग्रेग चॅपेल यांनी द्रविडला कर्णधारपदावरून हटवून आपणाला कर्णधार करण्याचे आमिष दाखविल्याचा गौप्यस्फोट केला.
आॅस्ट्रेलिया दौरा आव्हानात्मक असेल. या दौऱ्यातून भारतीय खेळाडूंना खूप शिकायला मिळेल, असे मत व्यक्त करून द्रविडने धोनी ब्रिगेडला शुभेच्छा दिल्या. तो म्हणाला, की आॅस्ट्रेलियाचा दौरा हा आव्हानात्मक असेल. येथील खेळपट्टी बाऊंसी असतात आणि त्यासमोर टिकणे हेच मोठे आव्हान आहे. इंग्लंडसारखी परिस्थिती येथे नसल्याने येथे एकदा सेट झाल्यास खोऱ्याने धावा करणेही सोपे जाते. येथे निकाल काही लागला, तरी आपल्याला बरेच शिकायला मिळते. मला येथे खेळणे नेहमी आवडते. यश-अपयश काही असो आॅसी दौऱ्यावरून मायदेशी परतल्यावर एक प्रकाराचा अभ्यास झाल्याचे नेहमी वाटायचे. (क्रीडा प्रतिनिधी)