शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
3
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
4
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
5
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
6
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
7
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
8
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
9
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
10
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
11
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
12
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
13
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
14
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
15
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
16
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
17
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
18
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
19
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
20
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती

"तू मला दिलेलं प्रॉमिस पूर्ण केलंस...", निखतनं 'सुवर्ण' जिंकताच सलमानकडून कौतुकाचा वर्षाव 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2023 17:54 IST

Women World Boxing Championship : सध्या भारतात जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिपचा थरार रंगला आहे. 

WBC 2023, Nikhat zareen । मुंबई : सध्या भारतात जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिपचा थरार रंगला आहे. भारताची स्टार महिला बॉक्सर निखत झरीनने भारतासाठी सुवर्ण पदक जिंकून इतिहास रचला आहे. तिने महिलांच्या जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत 50 किलो वजनी गटात ही किमया साधून तिरंग्याची शान वाढवली. भारताच्या निखतने या वजनी गटात व्हिएतनामच्या एनगुएन थि ताम हिला 5-0 असे नमवत सुवर्णपदकावर नाव कोरले. 

निखत झरीनचे सोनेरी यश खरं तर या स्पर्धेतील निखतचे हे दुसरे विजेतेपद आहे. वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये दोन विजेतेपदे पटकावणारी निखत ही दुसरी भारतीय महिला बॅक्सर ठरली आहे. यंदा या स्पर्धेत आतापर्यंत भारताच्या तीन महिला बॉक्सरनी सुवर्णपदावर नाव कोरले आहे. निखतच्या या सोनेरी यशानंतर बॉलिवूड अभिनेता सलमान खानने तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. 

सलमान खानने ट्विटच्या माध्यमातून म्हटले, "जेव्हा तू मला शेवटची भेटली होतीस तेव्हा तू मला प्रॉमिस केले होते की तू पुन्हा जिंकशील आणि तू ते केलेसच. निखतचा खूप अभिमान वाटतो. महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप जिंकल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन." 

निखत झरीन आणि एनगुएन थि ताम यांच्यामधील अंतिम लढतीतील पहिली फेरी रोमांचक झाली. त्यात रेफरींनी सर्वसहमतीने निकहतला पॉईंट दिले. व्हिएतनामी बॉक्सरने दुसऱ्या राऊंडमध्ये निकहतला पुन्हा कडवी टक्कर मिळाली. त्यानंतर प्रतिस्पर्धी बॉक्सरने हा राऊंड 3-2 अशा फरकाने जिंकला. अंतिम फेरीही अटीतटीची झाली. मात्र त्यात निखतने बाजी मारत सामना आपल्या नावावर केला. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :boxingबॉक्सिंगGold medalसुवर्ण पदकSalman Khanसलमान खानIndiaभारत