शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
2
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
3
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
4
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
5
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
6
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
7
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
8
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
9
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
10
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
11
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
12
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
13
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
14
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
15
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
16
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
17
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
18
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
19
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
20
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!

Commonwealth Games:नीरज चोप्राच्या दुखापतीनंतर आता रोहित यादव कडून पदकाची आशा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2022 15:54 IST

इंग्लंडच्या बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये अनेक भारतीय खेळाडू आपली प्रतिभा दाखवत आहेत.

बर्मिंगहॅम : इंग्लंडच्या बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये अनेक भारतीय खेळाडू आपली प्रतिभा दाखवत आहेत. स्पर्धेच्या सुरूवातीला भालाफेकपटू नीरज चोप्राच्या रूपात भारताला एक मोठा झटका बसला. पायाला झालेल्या दुखापतीमुळे नीरजने राष्ट्रकुल स्पर्धेतून माघार घेण्याचा मोठा निर्णय घेतला. त्यामुळे नीरज चोप्राची कमी विश्व थलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये १० व्या स्थानावर राहिलेला भालाफेकपटू रोहित यादव भरून काढणार का हे पाहण्याजोगे असणार आहे. पहिल्यांदाच राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये सहभागी झालेला रोहित बर्मिंगहॅममध्ये खूप घाम गाळत आहे.

विश्व थलेटिक्स चॅम्पियनशिप दरम्यान तब्येत ठीक नसल्यामुळे रोहित चांगले प्रदर्शन करू शकला नाही. ७८.७२ मीटर लांब भाला फेकून त्याला १० व्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. आता पुन्हा एकदा संधी मिळाली असून देशासाठी पदक मिळवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करणार असल्याचे रोहितने म्हटले आहे. ५ ऑगस्ट २०२२ रोजी रोहित यादव भालाफेकीत कमाल करून इतिहास रचणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

रोहितकडून समस्त भारतीयांना पदकाची आशारोहितचा मोठा भाऊ राहुल यादवने सांगितले की, "आम्हा तीन भावंडांमध्ये रोहित दोन नंबरचा असून आम्हाला आणखी एक भाऊ आहे. यावेळी तो नक्कीच पदक जिंकेल आणि देशाचे नाव रोशन करेल." बरेकाचे महाव्यवस्थापक यांनी रोहित राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये शानदार कामगिरी करेल असा विश्वास व्यक्त केला आहे. त्याच्याकडून संपूर्ण देशाला पदकाची अपेक्षा आहे. रोहित एवढ्या मोठ्या स्पर्धेत सहभागी होत आहे ही समस्त बरेकातील जनतेसाठी गर्वाची बाब असल्याचे त्यांनी अधिक म्हटले. 

दुखापतीमुळे नीरज चोप्राची स्पर्धेतून माघारराष्ट्रकुल स्पर्धा २०२२ च्या पूर्वसंध्येलाच भारताला एक मोठा झटका बसला. भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा आपल्या पायाच्या दुखापतीमुळे राष्ट्रकुल स्पर्धेतून बाहेर झाला. नीरजने या स्पर्धेत सहभागी न झाल्याने एक भावनिक पोस्ट देखील केली होती. त्याला वर्ल्ड थलेटिक्स चॅम्पियनशिप दरम्यान दुखापत झाली होती. अलीकडेच पार पडलेल्या या चॅम्पियनशिपममध्ये नीरजने रौप्य पदक पटकावून भारताचा तब्बल १९ वर्षांचा दुष्काळ संपवला. तसेच या चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या खात्यात पहिल्यांदाच रौप्य पदक आले आहे. 

 

टॅग्स :Neeraj Chopraनीरज चोप्राCommonwealth Games 2022राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धाIndiaभारत