16 वर्षानंतर हॉकीचे सोनेरी सीमोल्लंघन !
By Admin | Updated: October 3, 2014 03:12 IST2014-10-03T03:12:37+5:302014-10-03T03:12:37+5:30
पेनल्टी शूटआउटमध्ये रंगलेल्या या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 4-2 असा धुव्वा उडवत सुवर्णपदकावर नाव कोरले.

16 वर्षानंतर हॉकीचे सोनेरी सीमोल्लंघन !
>पाकिस्तानला नमवले; ‘रिओ’चे तिकीट मिळवले
विजयादशमीच्या पूर्वसंध्येला भारताने
16 वर्षानी हॉकीत सीमोल्लंघन करत आशियाई स्पध्रेत सोनं लुटलं.
पेनल्टी शूटआउटमध्ये रंगलेल्या या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 4-2 असा धुव्वा उडवत सुवर्णपदकावर नाव कोरले.
याचबरोबर भारताने रिओ ऑलिम्पिकचे तिकीटही मिळवले. हा आनंद साजरा करत असताना भारताची हॉकी टीम.
1998 मध्ये भारताने पेनल्टी शूटआउटमध्ये द. कोरियावर 4-2 असा, तर 1966मध्ये पाकवर 1-क् असा विजय साजरा केला होता.
भारतीय महिला संघाने 4 बाय 4क्क् मीटर रिले स्पर्धेत आशियाई स्पर्धेत विक्रम नोंदविला. भारताने या स्पर्धेत सलग चौथ्यांदा सुवर्णपदकाचा मान मिळविला. प्रियंका पवार, टिंटू, लुका, मनदीप कौर व एम.आर. पूवम्मा यांचा समावेश असलेल्या रिले संघाने सुवर्णपदकाला गवसणी घातली.