द. आफ्रिकेचा जम्बो दौरा
By Admin | Updated: July 28, 2015 02:10 IST2015-07-28T02:10:23+5:302015-07-28T02:10:23+5:30
दक्षिण आफ्रिकेचा संघ भारताच्या ७२ दिवसांच्या दौऱ्यावर येणार असून या दौऱ्यात ते ४ कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या दौऱ्याची सुरुवात २ आॅक्टोबरपासून

द. आफ्रिकेचा जम्बो दौरा
नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेचा संघ भारताच्या ७२ दिवसांच्या दौऱ्यावर येणार असून या दौऱ्यात ते ४ कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या दौऱ्याची सुरुवात २ आॅक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. सुरुवातीला या दोन देशांत तीन टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्याने होणार आहे. त्यानंतर पाच वन डे आणि चार कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. हा दक्षिण आफ्रिकेचा भारताचा आतापर्यंतचा सर्वात मोठा दौरा असेल.
पहिला टी-२० सामना २ आॅक्टोबरपासून धर्मशाळा येथे होणार आहे, तर अखेरचा टी-२० सामना कोलकाता येथे ८ आॅक्टोबरला खेळवला जाणार आहे. त्यानंतर कानपूर, इंदौर, राजकोट, चेन्नई, मुंबई येथे वन डे सामने खेळवले जाणार आहेत. मर्यादित षटकांच्या सामन्यानंतर पहिली कसोटी मोहाली येथे ५ ते ९ नोव्हेंबरदरम्यान होणार आहे. त्यानंतर बंगळुरू, नागपूर, दिल्ली येथे तीन कसोटी सामने होणार आहेत. बीसीसीआय आणि क्रिकेट दक्षिण आफ्रिका यांनी आज संयुक्त रूपाने या दौऱ्याची घोषणा केली आहे.
सीसीएचे मुख्य कार्यकारी हारुण लोर्गट म्हणाले, ‘‘हा भारताचा आमचा सर्वात मोठा दौरा असेल आणि प्रथमच आम्ही चार कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहोत. दोन्ही देश आता ही मालिका आयकॉन सिरीज बनण्याच्या दिशेने काम करीत आहे.’’
लोर्गट म्हणाले, ‘‘दुसरी कसोटी बंगळुरू येथे खेळवली जाणार आहे. जेथे दक्षिण आफ्रिकेने २००० मध्ये भारताविरुद्ध भारतात आपला एकमेव कसोटी मालिका विजय निश्चित केला होता. जर सर्व काही योग्य दिशेने होत राहिले तर हा अॅबी डिव्हिलियर्सचा १०० वा कसोटी सामना असेल आणि तो रॉयल चॅलेंजर्ससोबत जोडल्या गेल्यामुळे हे त्याचे दुसरे घरच आहे. त्यामुळे यापेक्षा दुसरे कोणते चांगले स्थळ असूच शकत नाही.’’
२९ सप्टेंबर : टी-२० सराव सामना, दिल्ली
२ आॅक्टोबर : पहिला टी-२० सामना, धर्मशाळा (दिवस-रात्र)
५ आॅक्टोबर : दुसरा टी-२० सामना, कटक (दिवस-रात्र)
८ आॅक्टोबर : तिसरा टी-२० सामना, कोलकाता (दिवस-रात्र)
११ आॅक्टोबर : पहिला वन डे, कानपूर
१४ आॅक्टोबर : दुसरा वन डे सामना, इंदोर (दिवस-रात्र)
१८ आॅक्टोबर : तिसरा वन डे, राजकोट (दिवस-रात्र)
२२ आॅक्टोबर : चौथा वन डे, चेन्नई (दिवस-रात्र)
२५ आॅक्टोबर : पाचवा वन डे, मुंबई (दिवस-रात्र)
३० ते ३१ आॅक्टोबर : अध्यक्षीय एकादश विरुद्ध सराव सामना (मुंबई)
५ ते ९ नोव्हेंबर : पहिली कसोटी (मोहाली)
१४ ते १८ नोव्हेंबर : दुसरी कसोटी (बंगळुरू)
२५ ते २९ नोव्हेंबर : तिसरी कसोटी (नागपूर)
३ ते ७ डिसेंबर : चौथी कसोटी (दिल्ली)