आफ्रिकेचा ‘अश्वमेध’ रोखला
By Admin | Updated: November 28, 2015 02:18 IST2015-11-28T02:18:04+5:302015-11-28T02:18:04+5:30
मर्यादित षटकांच्या मालिकेत भारताला भारतात पराभूत करणाऱ्या दक्षिण आफ्रिका संघाला टीम इंडियाने व्हीसीएच्या जामठा स्टेडियममध्ये शुक्रवारी तिसऱ्या कसोटीच्या तिसऱ्याच दिवशी लोळवले.

आफ्रिकेचा ‘अश्वमेध’ रोखला
नागपूर : मर्यादित षटकांच्या मालिकेत भारताला भारतात पराभूत करणाऱ्या दक्षिण आफ्रिका संघाला टीम इंडियाने व्हीसीएच्या जामठा स्टेडियममध्ये शुक्रवारी तिसऱ्या कसोटीच्या तिसऱ्याच दिवशी लोळवले. या विजयासह भारताने कसोटी मालिकाही जिंकली असून, दखल घेण्याची बाब म्हणजे जागतिक कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या दक्षिण आफ्रिकेने विदेशात नऊ वर्षांच्या कालावधीनंतर कसोटी मालिका गमावली आहे.
या पराभवामुळे विदेशात गेल्या नऊ वर्षांमध्ये १० कसोटी मालिका जिंकण्याचा दक्षिण आफ्रिकेचा अश्वमेध भारतात रोखला गेला. दक्षिण आफ्रिकेला २००६मध्ये श्रीलंकेत कसोटी मालिकेत ०-२ने पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर आजतागायत त्यांनी विदेशात कसोटी मालिका गमावली नव्हती, पण आता भारताने त्यांना पराभूत करण्याचा पराक्रम केला आहे.
2006 साली श्रीलंकेविरुद्ध लंकेत २-० असा व्हाइटवॉश मिळाल्यानंतर आफ्रिकेने आजतागायत एकही कसोटी मालिका विदेशामध्ये गमावली नव्हती.
कारकिर्दीतील पहिल्या ३१ कसोटी सामन्यांत १५ वेळा एकाच डावात ५ बळी घेणारा अश्विन एकमेव फिरकी गोलंदाज.
एकही अर्धशतक न झळकलेल्या या सामन्यात मुरली विजयची (४०) खेळी सर्वाधिक धावांची ठरली.
08 फलंदाज वैयक्तिक ३० - ४० धावांच्या खेळीमध्ये बाद झाले. याआधी २०१०-११च्या अॅसेश मालिकेत अशी कामगिरी झालेली.
13आफ्रिकेचे फलंदाज या सामन्यात एकेरी धावसंख्येवर बाद झाले. एकूण चौथ्यांदा आफ्रिकेवर अशी नामुश्की ओढावली.