आफ्रिकी वंशाचे अॅथलिट आशियासाठी धोका : ओसीए
By Admin | Updated: September 30, 2014 01:18 IST2014-09-30T01:18:47+5:302014-09-30T01:18:47+5:30
आशियाई स्पर्धेतील अॅथलेटिक्समध्ये पहिल्या दोन दिवसांत आफ्रिकन देशात जन्मलेल्या मात्र आशियाई देशाकडून खेळणा:या खेळाडूंनी 7 सुवर्णपदकांची कमाई केली आह़े

आफ्रिकी वंशाचे अॅथलिट आशियासाठी धोका : ओसीए
>इंचियोन : आशियाई ऑलिम्पिक परिषदेने (ओसीए) आफ्रिकी वंशाचे अॅथलिट आशियाईतील प्रतिभावंत खेळाडूंसाठी धोका असल्याचे म्हटले आह़े विशेष म्हणजे आशियाई स्पर्धेतील अॅथलेटिक्समध्ये पहिल्या दोन दिवसांत आफ्रिकन देशात जन्मलेल्या मात्र आशियाई देशाकडून खेळणा:या खेळाडूंनी 7 सुवर्णपदकांची कमाई केली आह़े
ओसीएचे उपाध्यक्ष वेई जिझोंग यांनी सांगितले की, काही देश आफ्रिकन वंशाच्या खेळाडूंची खरेदी करीत आहेत़ याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही़ त्यामुळे आशियातील प्रतिभावंत खेळाडूंचे नुकसान होत आह़े असे असले तरी आफ्रिकन वंशाच्या खेळाडूंच्या यशामुळे आशियाई देशांतील खेळांच्या कौशल्यात वाढ होत आहे, असेही वेई यांनी स्पष्ट केल़े नायजेरियन वंशाच्या ओगुनोड याने आशियाई स्पर्धेत कतारच्या ङोंडय़ाखाली खेळताना 1क्क् मीटर स्प्रिंट स्पर्धेत गोल्ड मिळविल़े याव्यतिरिक्त केनिया, मोरोक्को, इथोपिया या देशांच्या खेळाडूंनीही स्पर्धेत पदके मिळविली आहेत़ दरम्यान, ओसीएचे महानिदेशक हुसेन अल मुसल्लम म्हणाले, की आफ्रिकी वंशाच्या अॅथलिट्सनी आशियाई देशांकडून खेळल्यामुळे चिंतित नाही़ उलट या खेळाडूंमुळे खेळाचा स्तर उंचावण्यास मदत झाली आह़े (वृत्तसंस्था)