शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा ट्विस्ट...! 'ॲक्सिस माय इंडिया'कडून पश्चिम बंगालचा एक्झिट पोल जाहीर करण्यास नकार, अंदाजच येईना...
2
सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड...
3
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
4
'राजा शिवाजी'तील वाघनखं, चंद्रकोर, पेहेरावावरून सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा! पण रितेशने 'या' गोष्टींमध्ये बाजी मारली...
5
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
6
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
7
"एकनाथ शिंदेंनी हुल दिली अन् उद्धव ठाकरे..."; विधान परिषदेवरुन ज्योती वाघमारेंनी उडवली खिल्ली
8
MI vs SRH: मुंबई इंडियन्सच्या लाजिरवाण्या पराभवानंतर नीता अंबानी, आकाश अंबानींचा चेहराच पडला
9
ज्या बॉलरचं नाव ऐकून भल्याभल्यांना फुटतो घाम, त्यालाच मारला 'नो लूक सिक्स'; सलील आरोराचा व्हिडीओ व्हायरल?
10
“सॉरी जिया... मम्माला मरावंच लागेल”, महिलेची आत्महत्या; स्मशानभूमीत आला धडकी भरवणारा Video कॉल
11
Bank Holidays in May: मे महिन्यात १३ दिवस बँका राहणार बंद; कोणत्या राज्यात केव्हा असेल सुट्टी?
12
बागेत प्रियकरासोबत रोमान्स करत होती २ मुलांची आई, गावकऱ्यांनी दोघांना पाहिलं अन् पुढे असं काही केलं...
13
Buddha Purnima 2026 Wishes: बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा बुद्ध जयंती!
14
तिढा सुटला, विधान परिषद निवडणुकीतून काँग्रेसची माघार, अंबादास दानवे असतील मविआचे उमेदवार
15
महायुती-महाविकास आघाडीचे ठरले; पाहा, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी संपूर्ण उमेदवारांची यादी
16
Vastu Shastra: प्रगतीचे मार्ग मोकळे करायचे आहेत? मग तुमच्या घरातील 'हे' वास्तू दोष त्वरित दूर करा!
17
पश्चिम बंगालमध्ये भल्या भल्यांना कोडे सुटेना! ५१ लाख मतदार घटले तरी ३० लाख मते वाढली; ९३% मतदानाचा रेकॉर्ड कोणाचे टेन्शन वाढवणार?
18
"माझ्यावर हसतोय?" कुर्ल्यात तरुणावर चाकूनं सपासप वार, भररस्त्यात घडलेल्या घटनेनं खळबळ!
19
पुतिन-ट्रम्प यांची फोनवर चर्चा; युरेनियम रशियाला देण्याची ऑफर अमेरिकेने नाकारली! इराणचं टेन्शन वाढलं
20
अमेरिकेने भारताला परत केल्या ६५७ प्राचीन मूर्ती, अमूल्य ठेव्याची एवढी आहे किंमत 
Daily Top 2Weekly Top 5

अफगाणिस्तानचा मालिका विजय

By admin | Updated: February 28, 2017 04:02 IST

झिम्बाब्वेचा डकवर्थ-लुईस नियमाच्या आधारावर १०६ धावांनी पराभव केला आणि पाच सामन्यांच्या मालिकेत ३-२ ने सरशी साधली.

हरारे : आयपीएलसोबत जुळणारा अफगाणिस्तानचा पहिला खेळाडू ठरलेल्या मोहम्मद नबीच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर अफगाणिस्तानने रविवारी पाचव्या व अखेरच्या वन-डे आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात झिम्बाब्वेचा डकवर्थ-लुईस नियमाच्या आधारावर १०६ धावांनी पराभव केला आणि पाच सामन्यांच्या मालिकेत ३-२ ने सरशी साधली. अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारताना ५० षटकांत ९ बाद २५३ धावांची मजल मारली. सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरलेल्या रहमत शाह याने ५०, नबीने ४८, तर नूर अली जादरानने ४६ धावांचे योगदान दिले. झिम्बाब्वेतर्फे ख्रिस मोफूने तीन, तर रिचर्ड नगारवाने दोन बळी घेतले. सामन्यात पावसाचा व्यत्यय निर्माण झाला होता. त्यानंतर झिम्बाब्वेला २२ षटकांमध्ये १६१ धावांचे लक्ष्य देण्यात आले. झिम्बाब्वेचा संघ १३.५ षटकांत ५४ धावांत गारद झाला. त्यांच्या केवळ दोन फलंदाजांना दुहेरी धावसंख्या नोंदवता आली. नबीने गोलंदाजीमध्ये चमकदार कामगिरी करताना १४ धावांच्या मोबदल्यात ३ बळी घेतले. या व्यतिरिक्त आमिर हमजाने २० धावांच्या मोबदल्यात ३ आणि आयपीएलच्या लिलावामध्ये चार कोटी रुपयांना करारबद्ध झालेला फिरकीपटू राशिद खानने दोन षटकांत ८ धावांच्या मोबदल्यात २ बळी घेतले. (वृत्तसंस्था)