टी20 वर्ल्डकपमधून झिम्बाम्बेला आऊट करत अफगाणिस्तान टॉप टेनमध्ये दाखल
By Admin | Updated: March 12, 2016 18:49 IST2016-03-12T18:48:05+5:302016-03-12T18:49:47+5:30
टी20 वर्ल्डकपमधून झिम्बाम्बे संघ बाहेर पडला आहे. तर अफगाणिस्तानने झिम्बाम्बेवर विजय मिळवत टॉप टेनसाठी पात्र झाले आहेत

टी20 वर्ल्डकपमधून झिम्बाम्बेला आऊट करत अफगाणिस्तान टॉप टेनमध्ये दाखल
ऑनलाइन लोकमत -
नागपूर, दि. १२ - टी20 वर्ल्डकपमधून झिम्बाम्बे संघ बाहेर पडला आहे. तर झिम्बाम्बेवर विजय मिळवत अफगाणिस्तान संघ टॉप टेनसाठी पात्र झाला आहे. शनिवारी अफगाणिस्तान आणि झिम्बाम्बेमध्ये झालेल्या पात्रता फेरीमधील सामन्यात अफगाणिस्तानने टॉस जिंकून बॅटींगचा निर्णय घेतला होता.
अफगाणिस्तानने झिम्बाम्बेसमोर 187 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र अफगाणिस्तान संघाने 127 धावांमध्येच झिम्बाम्बेला ऑल आऊट केलं. अफगाणिस्तानने झिम्बाम्बेचा 59 धावांनी पराभव केला. मोहम्मद नाबीला मॅन ऑफ द मॅच घोषीत करण्यात आलं आहे. महत्वाचं म्हणजे आतापर्यंत 4 वेळा झिम्बाम्बे आणि अफगाणिस्तानमध्ये टी20 सामने झाले आहेत आणि चारही वेळा अफगाणिस्तानने झिम्बाम्बेचा पराभव केला आहे.