क्रिकेट सामन्यादरम्यान अफगाणिस्तानमध्ये बॉम्बस्फोट; ९ ठार
By Admin | Updated: September 29, 2015 00:02 IST2015-09-29T00:02:15+5:302015-09-29T00:02:15+5:30
अफगाणिस्तानमध्ये एका क्रिकेट सामन्यादरम्यान झालेल्या बॉम्ब स्फोटमध्ये सुमारे ९ लोक ठार झाले आहेत. तसेच ५० हून अधिक लोक या हल्ल्यात जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.

क्रिकेट सामन्यादरम्यान अफगाणिस्तानमध्ये बॉम्बस्फोट; ९ ठार
काबूल : अफगाणिस्तानमध्ये एका क्रिकेट सामन्यादरम्यान झालेल्या बॉम्ब स्फोटमध्ये सुमारे ९ लोक ठार झाले आहेत. तसेच ५० हून अधिक लोक या हल्ल्यात जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानी सीमारेषेवरील दक्षिणपूर्वी पाक्तिका प्रांतामध्ये हा आतंकवादी हल्ला झाला. दरम्यान, सुरुवातीला हा हल्ला फुटबॉल सामन्यात झाल्याची माहिती सांगण्यात येत होती. मात्र नंतर मंत्रालयाने दिलेल्या माहितीमध्ये हा हल्ला क्रिकेट सामन्यादरम्यान झाल्याचे स्पष्ट झाले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या हल्ल्यामध्ये स्थानिक सरकारी अधिकारी यांच्याविरोधात कट रचण्यात आला होता.(वृत्तसंस्था)