क्रिकेटदरम्यान जाहिरातींना ‘चाप’

By Admin | Updated: January 7, 2016 00:17 IST2016-01-07T00:17:45+5:302016-01-07T00:17:45+5:30

जगातील सर्वांत श्रीमंत क्रिकेट बोर्ड भारतीय क्रिकेट नियामक मंडळात (बीसीसीआय) बदलासाठी न्या. आर. एन. लोढा समितीने केलेल्या शिफारशींमुळे टेलिव्हिजनमध्ये क्रिकेट

Advertisement 'Arc' between cricket | क्रिकेटदरम्यान जाहिरातींना ‘चाप’

क्रिकेटदरम्यान जाहिरातींना ‘चाप’

नवी दिल्ली : जगातील सर्वांत श्रीमंत क्रिकेट बोर्ड भारतीय क्रिकेट नियामक मंडळात (बीसीसीआय) बदलासाठी न्या. आर. एन. लोढा समितीने केलेल्या शिफारशींमुळे टेलिव्हिजनमध्ये क्रिकेट मार्केटला जोरका झटका बसू शकतो. न्या. लोढा समितीच्या या शिफारशींची अंमलबजावणी केल्यास टेलिव्हिजनवरील क्रिकेट प्रक्षेपणाच्या मार्केटला जबरदस्त झटका बसू शकतो. क्रिकइन्फोच्या एका अहवालानुसार या शिफारशीची अंमलबजावणी झाल्यास षटक संपल्यानंतर ब्रेकमध्ये कोणतीही जाहिरात दाखविली जाणार नाही.
कोणत्याही आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यादरम्यान टेलिव्हिजनवरील प्रक्षेपणादरम्यान प्रत्येक षटकानंतर येणाऱ्या जाहिरातीवर बंदी आणायला हवी आणि सामन्यातील ड्रिंक्स, लंच आणि चहापानादरम्यानच जाहिराती दाखविण्यात याव्यात. भारतात कसोटी आणि एकदिवसीय सामन्याच्या प्रक्षेपणादरम्यान प्रत्येक षटकानंतर जाहिराती दाखविल्या जातात आणि अनेकदा तर जाहिराती सुरू असताना महत्त्वाचा एखाद-दुसरा चेंडू पाहण्याची संधीही हुकते, असे न्या लोढा समितीने अहवालात म्हटले आहे. अशा प्रकारची शिफारशी केल्यास आंतरराष्ट्रीय कसोटी आणि एकदिवसीय लढतीसाठी वर्तमान टीव्ही प्रक्षेपण कराराची समीक्षा केली जावी आणि नवीन कॉन्ट्रॅक्टमध्ये दोन्ही संघांच्या ब्रेक, लंच आणि चहापानादरम्यानच टीव्हीवर जाहिराती प्रक्षेपित केल्या जाव्यात, हे निश्चित केले जावे. जसे आंतरराष्ट्रीय स्तरावर होते. त्याचबरोबर टीव्हीच्या पूर्ण स्क्रीनला सामना प्रक्षेपणाच्या डिस्प्लेसाठी ठेवले जावे, असे समितीने त्यांच्या अहवालात म्हटले आहे.
आर्थिक बाबीने क्रिकेट खेळातील रोमहर्षकता आणि आनंदावर कसा कब्जा केला आहे, हे लोढा समितीने स्पष्ट केले.(वृत्तसंस्था)

Web Title: Advertisement 'Arc' between cricket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.