आता वनडेमध्येही अनुभवता येणार सुपर ओव्हरचा रोमांच
By Admin | Updated: February 6, 2017 14:16 IST2017-02-06T14:16:27+5:302017-02-06T14:16:27+5:30
इंग्लंडमध्ये होणाऱ्या चॅंम्पियन्स ट्रॉफीच्या निमित्ताने आता एकदिवसीय क्रिकेमध्येही सुपर ओव्हरचा रोमांच पाहता येणार आहे.

आता वनडेमध्येही अनुभवता येणार सुपर ओव्हरचा रोमांच
>ऑनलाइन लोकमत
दुबई, दि. 6 - ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये एखादा थरारक सामना टाय झाल्यावर तुम्ही सुपर ओव्हरचा रोमांच अनेकवेळा अनुभवला असेल. इंग्लंडमध्ये होणाऱ्या चॅंम्पियन्स ट्रॉफीच्या निमित्ताने आता एकदिवसीय क्रिकेमध्येही सुपर ओव्हरचा रोमांच पाहता येणार आहे. आयसीसीने जूनमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये उपांत्य किंवा अंतिम फेरीचे सामने टाय झाल्यास निकालासाठी सुपर ओव्हरचा अवलंब करण्याच्या पर्यायाला आयसीसीने मंजुरी दिली आहे. याआधी असा पर्याय केवळ अंतिम सामन्यांसाठी ठेवण्यात आला होता.
ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सामना टाय झाल्यावर सुपर ओव्हरचा अवलंब करण्याचे प्रसंग अनेकवेळा आले आहेत. पण, एकदिवसीय सामन्यात मात्र याआधी सुपर ओव्हरचा वापर झालेला नाही. याआधी एकदिवसीय क्रिकेटमध्ये उपांत्य किंवा अंतिम फेरीत सामना टाय झाल्यास बरोबरीची कोंडी फोडण्यासाठी सरस धावगती किंवा अन्य तत्सम पर्यायांचा अवलंब करण्यात येत असे.