अनुष्का शर्मासोबतच्या प्रेमाची विराटने दिली कबुली

By Admin | Updated: April 15, 2017 00:26 IST2017-04-15T00:06:40+5:302017-04-15T00:26:13+5:30

विराट कोहलीला खांद्याची दुखापत झाल्यानंतर अनुष्का शर्माने त्याची भेट घेऊन विचारपूस केली होती

Aditya's love affair with Anushka Sharma confesses | अनुष्का शर्मासोबतच्या प्रेमाची विराटने दिली कबुली

अनुष्का शर्मासोबतच्या प्रेमाची विराटने दिली कबुली

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 14 - भारतीय कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचे प्रेमप्रकरण सर्वांना माहीत आहे. दोघांनीही आपल्या प्रेमाची कबुली कधी दिली नाही. पण त्यांना अनेक वेळा एकत्र पाहिलं आहे. तरुणाईमध्ये यांबद्दल सतत चर्चा होत असतात. विराट कोहलीला खांद्याची दुखापत झाल्यानंतर अनुष्का शर्माने त्याची भेट घेऊन विचारपूस केली होती. तर एका सामन्यावेळी अनुष्का उपस्थित राहिल्यानंतर विराट शून्य धावावर बाद झाला त्यानंतर सोशल मीडियावर अनुष्काला ट्रोल करण्यात आले. त्यावेळी अनुष्काची बाजू घेत विराटने नोटीझन्सला चांगलेच धुतले होते. त्यांनी आपल्या प्रेमाची कबुली दिली नसली तरी त्यांनी ते लपवलेही नाही.
दुखापतीतून सावरल्यानंतर विराट कोहलीने आज विराट कोहलीने मुंबई विरुद्ध पुनरागमन केले. पहिल्या सामन्याआधी विराटने त्याची गर्लफ्रेंड अनुष्का शर्मासोबत एक फोटो त्याच्या इंस्टाग्राम प्रोफाईलवर टाकला आहे. हा फोटो युवराज सिंगच्या लग्नातला असल्याचे दिसत आहे. विराट कोहलीने खुल्लमखुल्ला आपल्या प्रेमाची कबुली दिली नसली तरी अनुष्का शर्मासोबतचा फोटो प्रोफाईलला ठेऊन एकप्रकारे आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे.

Web Title: Aditya's love affair with Anushka Sharma confesses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.