शहरं
Join us  
Trending Stories
1
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
2
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
3
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
4
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
5
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
6
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
7
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
8
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
9
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!
10
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
11
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
12
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
13
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
14
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
15
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
16
‘मोसाद’चे धाडसी ऑपरेशन्स आणि त्याची खासियत काय?
17
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
18
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री
19
राज्यात १० ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक
20
प्रतिभा अमेरिकेबाहेर पडते आहे? - वेलकम टू इंडिया!

आदित्य मेहताचे विजेतेपद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2015 01:54 IST

विजेतेपदाचा प्रबळ दावेदार असलेल्या आदित्य मेहताने एकतर्फी झालेल्या सामन्यात एकहाती वर्चस्व राखताना वरुण मदनचा ८-१ असा सहजपणे फडशा

मुंबई : विजेतेपदाचा प्रबळ दावेदार असलेल्या आदित्य मेहताने एकतर्फी झालेल्या सामन्यात एकहाती वर्चस्व राखताना वरुण मदनचा ८-१ असा सहजपणे फडशा पाडून पहिल्या खुल्या प्रो स्नूकर सिरीज स्पर्धेचे दिमाखदार विजेतेपद उंचावले. संपूर्ण स्पर्धेत चमकदार खेळ केलेल्या वरुणचा अंतिम सामन्यात आदित्यचा अनुभवासमोर काहीच निभाव लागला नाही.वरळी येथील नॅशनल स्पोटर््स क्लब आॅफ इंडिया (एनएससीआय) येथे नुकताच पार पडलेल्या या अंतिम सामन्यात आदित्यने आपल्या लौकिकानुसार अचूक स्ट्रोकचा धडाका लावताना वरुणला विजयाची एकही संधी दिली नाही. पहिल्याच फ्रेममध्ये मोठ्या फरकाने बाजी मारून दणक्यात सुरुवात केल्यानंतर आदित्यने दुसऱ्या फ्रेममध्ये ११६ गुणांचा ब्रेक करून वरुणला दबावाखाली आणले. यानंतरच्या दोन्ही फ्रेममध्येदेखील मोठ्या फरकाने बाजी मारताना आदित्यने बेस्ट आॅफ १५ फ्रेमच्या या मॅरेथॉन लढतीत ४-० अशी मजबूत आघाडी घेतली. त्याचवेळी पाचव्या फ्रेममध्ये वरुणने कडवा खेळ करताना आदित्यच्या चुकलेल्या प्रत्येक स्ट्रोकचा फायदा उचलून ६५-३१ अशा गुणांनी पहिला फ्रेम जिंकला. यामुळे त्याने आपली पिछाडी १-४ या गुणांनी कमी करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला खरा, मात्र यानंतर आदित्यने आपला आंतरराष्ट्रीय दर्जा सिद्ध करताना पुन्हा एकदा सलग चार फ्रेम जिंकून ८-१ अशा दणदणीत विजयासह विजेतेपदाला गवसणी घातली. संपूर्ण सामन्यावर दबदबा राखलेल्या आदित्यने वरुणला कोणतीही संधी न देताना ७९(६२)-१४, १२३(११६)-११, ९३(४८)-२९, ७२-६, ३१-६५, १११(८४)-१३, १०२(८८)-२५, ६६-१५, ८१(८१)-८ असा दिमाखदार विजय मिळवला. संपूर्ण स्पर्धेत अनुभवी धरमींदर लीली याने ११९ आणि १०० असे सर्वाधिक दोन शतकी ब्रेक नोंदवले. त्याचवेळी आदित्यने अंतिम सामन्यात नोंदवलेला एकमेव शतकी ब्रेक स्पर्धेतील सर्वाधिक गुणांचा ब्रेक ठरला. तसेच बलाढ्य पंकज अडवाणी (११४) आणि लक्ष्मण रावत (१०२) यांनीदेखील शतकी ब्रेक नोंदवून आपली छाप पाडली. (क्रीडा प्रतिनिधी)