अदिती एलपीजीएमध्ये संयुक्त आघाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 00:47 IST2018-05-07T00:47:22+5:302018-05-07T00:47:22+5:30

भारताच्या अदिती अशोक हिने व्हॉलंटियर्स आॅफ अमेरिका एलपीजीए टेक्सास क्लासिक गोल्फमध्ये आघाडी घेतली आहे. या स्पर्धेला खराब वातावरणामुळे ३६ होल पर्यंत करण्यात आले आहे.

 Aditi is on joint Lead in LPGA | अदिती एलपीजीएमध्ये संयुक्त आघाडीवर

अदिती एलपीजीएमध्ये संयुक्त आघाडीवर

द कॉलोनी, अमेरिका : भारताच्या अदिती अशोक हिने व्हॉलंटियर्स आॅफ अमेरिका एलपीजीए टेक्सास क्लासिक गोल्फमध्ये आघाडी घेतली आहे. या स्पर्धेला खराब वातावरणामुळे ३६ होल पर्यंत करण्यात आले आहे. अदिती हिने काल पहिल्या फेरीत चांगला खेळ केला. त्यासोबत तिला कालच स्पर्धेची अंतिम फेरी देखील खेळायची होती. अदिती हिने ३२ होलपर्यंत सहा अंडरच्या एकूण स्कोअरसह चार अन्य खेळाडूंसोबत संयुक्त आघाडी घेतली आहे. निकोल ब्रोच, गॅबी लोपेज, जेनी सिन आणि स्युंग ह्यून पार्क या देखील तिच्यासोबत संयुक्त आघाडीवर आहेत. निकोलने चार आणि गॅबी हिला आणखई सात होल खेळायचे आहेत. तर जेनी आणि सुंग यांनी अजून दुसऱ्या फेरीचा खेळ सुरू केलेला नाही.
 

Web Title:  Aditi is on joint Lead in LPGA