कॉलम जोड
By Admin | Updated: February 13, 2015 23:10 IST2015-02-13T23:10:59+5:302015-02-13T23:10:59+5:30

कॉलम जोड
>पाकिस्तान संघ मैदानावर कशी कामगिरी करतो, ही बाब महत्त्वाची आहे. पाक संघाने स्वत:वर विश्वास ठेवायला हवा. पाकिस्तान संघाच्या अलीकडच्या कालावधीतील कामगिरीवरून त्यांच्यात विजयाचा विश्वास आहे, असे चित्र दिसले नाही. चांगल्या गोलंदाजी आक्रमणाविरुद्ध पाकिस्तान संघाला संघर्ष करावा लागेल, असे चित्र आहे. भारताविरुद्धची सलामीची लढत त्यांच्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. या लढतीत पाकिस्तान संघ विजय मिळविण्यात यशस्वी ठरला तर त्यांची या स्पर्धेतील वाटचाल सुकर होईल. या लढतीत पराभव स्वीकारावा लागला तर पाकिस्तान संघाचे मनोधैर्य ढासळण्याची भीती आहे. पाक संघाच्या कामगिरीबाबत या वेळीही भाकित वर्तविणे कठीण आहे, पण या वेळी त्यांची स्थिती मात्र नाजूक आहे, हे नक्की. (टीसीएम)०००००